Officials of Farmers and Orchardists Board at the time of 'loading' bananas at the station. esakal
जळगाव

Jalgaon News: निंभोऱ्यातून केळी वॅगन्सला ‘ग्रीन सिग्नल’! अखेर 12 वर्षांनंतर रेक दिल्लीकडे रवाना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

Jalgaon News : निंभोरा रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी (ता. ७) सतरा वॅगन्समधून केळी रवाना झाली. या वॅगन्समधून सुमारे ३ हजार ७४० क्विंटल केळी भरून रवाना करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

निंभोरा बुद्रुक (ता. रावेर) : येथील रेल्वेस्थानकावरून तब्बल बारा वर्षांनंतर सतरा व्हीपीयू रेक शुक्रवारी (ता. ७) वॅगन्स दिल्लीकडे रवाना झाले आहेत. निंभोरा स्थानक येथून परप्रांतात केळी पाठविण्यासाठी वॅगन्स रेक मिळावा म्हणून निंभोरा स्टेशन येथील फळबागायतदार शेतकरी मंडळातर्फे व केळी उत्पादक शेतकऱ्यांतर्फे खासदार रक्षा खडसे तसेच रेल्वे विभागाचे डीआरएम ईती पाण्डेय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या मागणीला यश मिळाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. (Green Signal to Banana Wagons from Nimbhori)

निंभोरा रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी (ता. ७) सतरा वॅगन्समधून केळी रवाना झाली. या वॅगन्समधून सुमारे ३ हजार ७४० क्विंटल केळी भरून रवाना करण्यात आली, अशी माहिती अध्यक्ष कडू चौधरी, उपाध्यक्ष मोहन पाटील, गणेश पाटील, विजय महाजन, किरण नेमाडे, विनोद पाटील, मनोहर चौधरी यासह मंडळ पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.

बारा वर्षांच्या खंडानंतर प्रथमच रेल्वेतून केळी परप्रांतात जाणार असल्याने निंभोरा फळ बागायतदार मंडळाचे अध्यक्ष कडू चौधरी व संचालक किरण नेमाडे तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे, शेतकरी ललित कोळंबे यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रेल्वे वॅगन्स इंजिन चालक गार्ड तसेच स्टेशन अधीक्षक यांचा सत्कार करून रेल्वे इंजिनची व वॅगन्सची विधिवत पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन केळी भरण्याचा प्रारंभ करण्यात आला. (latest marathi news)

रेल्वेस्थानक परिसर गजबजला

दरम्यान, सायंकाळी साडेसहा दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून वॅगन्स उशिरा मिळाल्याने रात्री उशिरापर्यंत केळी वॅगन्स दिल्लीकडे रवाना झाल्या. यामुळे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्टेशन परिसरामध्ये केळी वाहतूक करणारे ट्रॅक्टर, तसेच वाहनधारक व कामगार, केळी उत्पादक शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे स्टेशन परिसर गजबजला होता. सर्वत्र मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने शेतकऱ्यांसोबतच मजूर वर्गांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT