Heavy rain continued in the city on Thursday afternoon. esakal
जळगाव

Jalgaon Monsoon Rain : दहा-पंधरा मिनिटांच्या धुवॉंधार पावसाने ‘जल’गाव; चोहीकडे पाणीच पाणी

Monsoon Rain : शहरात गुरुवारी (ता. १३) दुपारी साडेचारच्या सुमारास दहा-पंधरा मिनिटेच जोरदार पाऊस झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Monsoon Rain : शहरात गुरुवारी (ता. १३) दुपारी साडेचारच्या सुमारास दहा-पंधरा मिनिटेच जोरदार पाऊस झाला. मात्र, या अल्प पावसानेदेखील शहर ‘जल’गाव झाले आणि नागरिकांची त्रेधा उडाली. अमृत योजनेंतर्गत भुयारी गटारांसह रस्त्यांची कामे करतान सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने न झाल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर चोहीकडे पाणीच पाणी झाले. गुडघ्याएवढ्या पाण्यात नागरिकांना वाट काढावी लागली, तर काहींच्या दुकानात पाणी शिरल्याने मालाचे नुकसान झाले. (jalgaon heavy rain on thursday )

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. मंगळवारी (ता. ११) रात्री शहरात चांगला पाऊस झाल्यानंतर काही भागातील घरांमध्ये थेट पाणी शिरले. बुधवारी (ता. १२) पावसाने विश्रांती घेतली. मात्र, गुरुवारी दुपारी जळगावात पुन्हा पाऊस झाला.

शहरात जोरदार, वाढीव भागात तुरळक पाऊस

गुरुवारी सकाळपासून उकाडाही प्रचंड जाणवत होता. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे चांगला पाऊस होईल, अशी शक्यता होती. दुपारी साडेचारच्या सुमारास आकाशात ढगांनी मोठी गर्दी केली. अचानक जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली. (latest marathi news)

विशेष म्हणजे, जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात नवीपेठ, दाणाबाजार, स्टेट बँक मुख्य शाखेजवळील परिसर, रिंग रोड, विसनजीनगर, जिल्हापेठ भागात दहा ते पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. तर शहरालगतचा महाबळ, संभाजीनगर, मोहाडी रोड, तसेच अन्य परिसरात अगदीच तुरळक पाऊस झाला.

रस्त्यांवर पाणीच पाणी

गेल्या काही वर्षांत जळगावात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटारांची कामे झाली आहेत. तर अनेक वर्षांपासून खड्ड्यात गेलेल्या शहरात तीन- चार वर्षांत रस्त्यांची कामेही बऱ्यापैकी झाली. मात्र, या सर्व कामांची अंमलबजावणी अगदीच नियोजनशून्य झाल्यामुळे थोडा पाऊस झाला, तरी शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाण्याचे तलाव साचलेले दिसतात. गुरुवारी दुपारी अगदीच दहा मिनिटे जोरात पाऊस झाला. मात्र, या पावसाने रस्त्यारस्त्यांवर पाणी साचले.

ड्रॅनेजची समस्या तीव्र

जळगाव शहरात अमृत योजनेंतर्गत भुयारी गटारांचे काम झाले असले, तरी अनेक प्रमुख रस्त्यांलगत गटारांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचून काही ठिकाणी दुकानांमध्येही शिरते. शिवाय शहरातील मध्यवर्ती भागात सांडपाण्याची विल्हेवाट होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण गटार नाहीत. ज्या ठिकाणी गटार आहेत, त्या चोकअप झाल्या आहेत. त्यामुळे गटारांमधील पाणी रस्त्यांवर येऊन वाहनधारकांचे हाल होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Suvendu Adhikari? : एकेकाळी ममता बॅनर्जींचे निकटवर्ती ते आता पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री! कोण आहेत सुवेंदू अधिकारी? काँग्रेसमधून केलेली राजकारणाला सुरुवात

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी, सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी कोलकाता येथील लोक भवनात दाखल

DC vs KKR Live: लोकेश राहुलची ऐतिहासिक कामगिरी! IPL मध्ये असा पराक्रम केला, जो आतापर्यंत एकालाही नव्हता जमला...

Thalapathy Vijay Government : तमिळनाडूत 'थलपती'चा ऐतिहासिक 'विजय'! बहुमताचा गाठला जादूई आकडा, उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; 'द्रविडी' राजकारणात नवा अध्याय

SCROLL FOR NEXT