marriage  esakal
जळगाव

Jalgaon News : विवाहात अवांतर खर्चाला फाटा देवून समाजभवनास मदत; पाचोरा येथे गुर्जर परिवाराचा आदर्श

Jalgaon : अलीकडच्या काळात विवाहापूर्वी व नंतरही होणाऱ्या विविध कार्यक्रम व विधीत पैशांची उधळपट्टी करत आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची मनोवृत्ती विकसित होत असल्याचे दिसते.

प्रा. सी. एन. चौधरी

Jalgaon News : अलीकडच्या काळात विवाहापूर्वी व नंतरही होणाऱ्या विविध कार्यक्रम व विधीत पैशांची उधळपट्टी करत आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची मनोवृत्ती विकसित होत असल्याचे दिसते. यासंदर्भात अनेक साधक-बाधक प्रतिक्रिया व्यक्त होतात. अशा परिस्थितीत गुर्जर समाज मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पाचोरा येथील स्वातंतत्र्यसैनिक (कै.) दामोदर महाजन यांचे पुत्र संदीप महाजन त्यांच्या अर्धांगिनी शीतल महाजन यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. Helping society by cutting unnecessary expenses in marriage )

शुक्रवारी (ता. ३) होणाऱ्या आपली कन्या प्रा. डॉ. वैष्णवी महाजन हिच्या विवाह सोहळ्यात आर्थिक परिस्थितीने सक्षम असतानाही कोणताही बडेजाव न करता व अवांतर खर्चाला फाटा देत गुर्जर समाज भवनासाठी भरीव मदत दिली आहे. प्री-वेडींग शूटिंग, बॅन्ड, डीजे, ऑक्रेस्ट्रॉ, घोडा, बग्गी, पत्रिका छपाई व वाटपाचा खर्च, मुळ लावणे, अक्षदांच्या तांदूळाची नासाडी, अशा रूढी परंपरांना फाटा देत मुंबई येथे होणाऱ्या समाजमंदिराच्या उभारणीसाठी एक लाख ११ हजार १११ रुपयांची भरीव देणगी दिली.

त्यांच्या या औदार्याला त्यांच्या अर्धांगिनी गो. से. हायस्कूलमधील शिक्षिका शीतल महाजन यांनीही आपल्या वडिलांच्या नावे ३१ हजार रुपयांची भरीव मदत देऊन आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. लोहटार (ता. पाचोरा) येथील रहिवासी व पालिकेत ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर असलेल्या (कै.) दामोदर महाजन यांनी बालवयातच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशविरोधी कारवाया केल्याने येरवडा तुरूंगात सहा महिने शिक्षा भोगली.

त्यांचे पुत्र ध्येय अ‍ॅकॅडमीचे संचालक तथा पत्रकार संदीप महाजन यांची कन्या प्रा. डॉ. वैष्णवी महाजनचा विवाह परधाडे येथील रहिवासी व सध्या जळगाव येथे वास्तव्यास असलेले राहुरी कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ, मुक्ताईनगर कृषी कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. सुदाम पाटील यांचे एम.टेक. इलेक्ट्रीकल ही उच्च शैक्षणिक पात्रता असलेले पुत्र अनंत पाटील यांच्याशी निश्‍चित झाला.

संदीप महाजन व शीतल महाजन यांनी विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात, पण अवांतर खर्च व बडेजावला फाटा देऊन खारघर येथील गुर्जर समाज भवनासाठी भरीव मदत देण्याचा विषय मांडला. त्या विषयास वर पक्षाने मान्यता दिली. वधू वैष्णवी स्वातंत्र्यसैनिकाची नात, तर वर अनंत भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल असलेले चारूदत्त सुदाम पाटील यांचे लहान बंधू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India China Trade : सहा वर्षांपासून बंद कुलूप अखेर उघडणार! भारत-चीन संबंधांना नवं वळण, गलवाननंतर पहिली मोठी हालचाल!

हमजा नाहीतर DHURANDHAR 2 चा खरा किंग आहे 'हा' अभिनेता, त्याने दाऊदला सुद्धा सोडलं नाही, 45 वर्ष केलं पाकिस्तानात राज

Rare Wildlife Ratnagiri : निसर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! सह्याद्रीच्या पायथ्याशी पहिल्यांदाच दिसला राज्यप्राणी 'शेकरू'; जोडीदाराचाही शोध सुरू

Sangamner Acid Attack: संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी; संगमनेर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, तपासासाठी दहा पथके तैनात!

Hingoli News: अवेळी पावसाने गहू काढणीला तडाखा; हार्वेस्टर अभावाने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT