Water Reservoir in Anjani Project. esakal
जळगाव

Jalgaon News : अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ; नदी नाले कोरडेच

Jalgaon : शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील पळासदड येथील अंजनी प्रकल्प परिसरात तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील पळासदड येथील अंजनी प्रकल्प परिसरात तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होत आहे. सध्यास्थितीत प्रकल्पात केवळ आठ टक्के जलसाठा आहे. मात्र, पद्मालय, भालगाव, खडकेसीम येथील तलावांमधील जलाशयात अद्यापपर्यंत वाढ झालेली दिसून येत नाही. (Increase in water storage in Anjani project river drains remain dry )

पळासदड येथील अंजनी प्रकल्पातून एरंडोल शहरासह कासोदा, धारागीर, जळू, हणमंतखेडे, फरकांडे, टोळी यांसह अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्यामुळे एरंडोल शहरात सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा असल्यास रब्बी पिकांसाठी व धरणगाव शहरासाठीदेखील आवर्तन सोडण्यात येत असते. मात्र, अंजनी प्रकल्पात नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक सुरू झाली आहे.

त्यातून प्रकल्पात सध्या आठ टक्के जलसाठा झालेला आहे. अंजनी प्रकल्पाच्या अगोदर सुमारे चौदा ते पंधरा बंधारे आहेत. ते सर्व बंधारे भरल्यानंतर प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होत असते. सध्यास्थितीत अंजनी प्रकल्पात ४.८५५ दशलक्ष घनमीटर एवढा जलसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त जलसाठा केवळ १.०८३ आहे. त्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होण्यासाठी अंजनी नदीच्या उगमस्थळ परिसरात मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. (latest marathi news)

प्रकल्पात आठ टक्के जलसाठा असला तरी प्रकल्पातून हजारो ब्रास गाळ उपसण्यात आल्यामुळे प्रकल्पाचे पात्र खोल झालेले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जलसाठ्याची टक्केवारी सुमारे बारा ते पंधरा टक्के असण्याची शक्यता आहे. तालुक्यातील भालगाव, खडकेसीम, पद्मालय येथील तलावांमध्येदेखील अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंजनी प्रकल्पासह भालगाव, खडकेसीम व पद्मालय येथील तलावांमध्ये पूर्णपणे जलसाठा होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.

शेतीची कामे खोळंबली!

एरंडोल तालुक्यात पाच ऑगस्टपर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे पन्नासटक्के पाउस झाला असताना तालुक्यातील नदी व नाल्यांना अद्यापपर्यंत पूर आलेला नसल्यामुळे नदीचे पात्र कोरडेच आहेत. विहिरींच्या पाणीपातळीतदेखील अद्यापपर्यंत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधूनही चिंता व्यक्त केली जात आहे. सुमारे पंधरा दिवसांपासून दररोज पाऊस येत आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. शेतीच्या अंतर्गत कामांसाठी पावसाने विश्रांती घेण्याची गरज आहे.

अंजनी नदीला पूर न आल्याने नदीपात्रातील घाणदेखील वाहून गेलेली दिसत नाही. त्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत आहे. मुख्यमंत्री लाडली बहिण योजनेमुळे शेतमजुरांची टंचाई सर्वत्र जाणवत आहे. संततधार पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून, पिकांवर रोगराई पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंजनी प्रकल्पासह अन्य तलावांमध्ये समाधानकारक जलसाठा होण्यासाठी नागरिकांसह शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT