kaviyitri Bahinabai Chowdhury Entrance of North Maharashtra University esakal
जळगाव

Jalgaon KBCNMU News : ‘द वीक’च्या सर्वेक्षणात ‘उमवि’ 50 व्या स्थानावर; बहुविद्याशाखीय गटात रॅकिंग

Jalgaon KBCNMU : ‘द वीक-हंसा’ रिसर्चतर्फे २०२४ साठी भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

सकाळ वृतसेवा

Jalgaon KBCNMU News : भारतातील प्रतिष्ठीत अशा ‘द वीक’ या इंग्रजी नियतकालिकाने भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या केलेल्या सर्वेक्षणात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने बहुविद्याशाखीय विद्यापीठाच्या गटात भारतात ५० वे, तर पश्चिम विभागीय विद्यापीठांमध्ये ९ वे स्थान प्राप्त केले असून, खान्देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘द वीक-हंसा’ रिसर्चतर्फे २०२४ साठी भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. ( KBCNMU UMV rank 50th in Week survey )

यामध्ये पारंपरिक विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे, तांत्रिक विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे यांचा समावेश होता. बहुविद्याशाखीय, तांत्रिक, वैद्यकीय अशी वर्गवारी या सर्व्हेक्षणात करण्यात आली. या सर्व्हेक्षणासाठी विद्यापीठ स्थापनेचा कालावधी, विद्यापीठाला प्राप्त झालेली नॅक मूल्यांकनाची श्रेणी, विद्यापीठातील पायाभूत व इतर सुविधा, शिक्षक, संशोधन, अभ्यासक्रम व उपक्रम, तसेच विद्यार्थी संख्या व त्या विद्यार्थ्यांना मिळणारा वाव आणि प्लेसमेंट आदी निकषांच्या आधारे हे सर्व्हेक्षण करण्यात आले.

प्राथमिक सर्व्हेक्षणातील प्राप्त माहितीची शैक्षणिक तज्ज्ञांकडून वर्गवारी करण्यात आली. देशातील विद्यापीठांच्या उत्कृष्ट बहुविद्याशाखीय गटात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ३०७ गुणांसह ५०व्या स्थानी आले. या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीने ७३१ गुण प्राप्त केले आहेत.(latest marathi news)

या सर्व्हेक्षणात बहुविद्याशाखीय विद्यापीठांची विभागनिहाय वर्गवारीदेखील करण्यात आली. पश्चिम विभागीय गटात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ९ व्या स्थानावर आले. या पश्चिम विभागीय गटात, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे फलित

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने नॅक पुर्नमूल्यांकनात ‘अ’ श्रेणी कायम राखली. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात विद्यापीठाने महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. संशोधनाला चालना मिळण्यासाठी विद्यापीठाने सामाजिक संस्था, उद्योग समूह यांच्या सहकार्याने काही योजना सुरू केल्या आहेत. विद्यापीठ अधिक समाजाभिमुख होण्यासाठी कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकार मंडळाच्या सहकार्याने प्रयत्नशील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT