District President Anil Wagh while guiding the meeting of MNS chief office bearers. Officials present in front. esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : मनसे जळगाव लोकसभा लढविण्याचा आग्रह धरणार

Jalgaon Lok Sabha Election : गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. परंतु केंद्रात व राज्यात तसेच या जिल्ह्यामध्ये तिघाही प्रमुख पक्षाचे कॅबिनेट मंत्री असताना देखील जिल्ह्यासह जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास झालेला कुठेही दिसून येत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून मनसेने नवा पर्याय म्हणून निवडणूक लढवावी, असा आग्रह मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी सांगितले. (Jalgaon Lok Sabha Election 2024 MNS will insist on contesting Anil Wagh to raj thackeray)

येथे सोमवारी (ता. १८) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत जिल्हाध्यक्ष वाघ म्हणाले, की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न झालेला पाहावयास मिळत नाही. आजही शहरासह ग्रामीण भागातील तरुण वर्ग रोजगारीच्या संधी शोधण्यासाठी मुंबई, पुणे नाशिक व इतर मोठ्या शहरांमध्ये जाताना दिसून येतो.

अनेक भागांना पाणीटंचाईमुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. बलून बंधारे आजही प्रतीक्षेत आहे. तीन-तीन मंत्री असताना व मंजुरी असताना देखील बंधारे का उभे केले गेले नाही, असे एक ना अनेक समस्या या मतदार संघामध्ये आहे. हे चित्र बदलण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सर्वसामान्यांचा आवाज उठविण्यासाठी या मतदारसंघांमध्ये उमेदवार द्यावा.

अशी मागणी त्यांना भेटून करावी, असे भडगाव येथे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रज्वल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बागूल, भडगाव तालुकाध्यक्ष सागर पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील.

एरंडोल तालुकाध्यक्ष विशाल सोनार, भडगाव शहराध्यक्ष तुषार पाटील, पाचोरा शहराध्यक्ष ऋषी भोई, चाळीसगाव शहराध्यक्ष शैलेश मोरे, पारोळा शहराध्यक्ष छोटू लोहार, अमोल कांबळे, शरद पवार, परवेज पठाण, कृष्णा धुंदले यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Cyber Fraud : डेक्कन, कोथरूडमधील दोन महिलांची १५ लाखांची फसवणूक

Jain Boarding Scam : जैन बोर्डिंगच्या व्यवहाराला स्थगिती, धर्मादाय आयुक्तांचे आदेश; २८ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

Matru Vandana Yojana : ‘मातृ वंदना’ ठरली लाखो गर्भवतींसाठी संजीवनी; राज्‍यात १ हजार ८३८ कोटींचा निधी वितरित

AUS vs IND: रोहित शर्मा नितीश रेड्डीला वनडे पदार्पणाची कॅप देताना नेमकं काय म्हणाला होता? BCCI ने शेअर केलाय Video

SCROLL FOR NEXT