deposit  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवारांच्या अनामत जप्त

Lok Sabha Election : निवडणूक आयोगच्या निर्णयानुसार १/६ पेक्षा जास्त मतदान न झालेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील १२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : निवडणूक आयोगच्या निर्णयानुसार १/६ पेक्षा जास्त मतदान न झालेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील १२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे, अशी माहिती जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी (ता. ५) दिली. जळगाव लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ११ लाख ५५ हजार ६३४ मते वैध असून, वैध मतांच्या १/६ मते ही १ लाख ९२ हजार ६०५ इतकी आहेत. ( deposit of 12 candidates were confiscated )

जळगाव लोकसभा मतदारसंघातील १४ पैकी १२ उमेदवारांना एकूण वैध मतांच्या (नोटाला पडलेली मते वगळून) १/६ पेक्षा जास्त मतदान न झाल्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत भरणा केलेली अनामत रक्कम जप्त करून शासन खाती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. १२ उमेदवारांची एकूण २ लाख ८७ हजार ५०० रुपये अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवार स्मिता उदय वाघ व करण बाळासाहेब पाटील-पवार यांना एकूण वैध मतांच्या १/६ पेक्षा जास्त मते मिळाल्यामुळे त्यांनी भरणा केलेली अनामत रक्कम प्रत्येकी २५ हजार संबंधितांना तत्काळ परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही रक्कम संबंधित उमेदवार अथवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधींना प्रदान करणे व जप्त झालेली अनामत रक्कम शासन जमा करण्यासाठी महसूल सहाय्यक स्वप्नील येवले यांना प्राधिकृत केले आहे. त्यांनी रक्कम शासन जमा करून चलनाची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील संचिकेत दाखल करावी व पूर्ण कार्यवाहीची संचिका उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात जमा करावयाची आहे. (latest marathi news)

उमेदवाराचे नाव--प्राप्त वैध मते--जप्त अनामत

विलास शंकर तायडे--६३८१--१२५००

एक्स-हवालदार ईश्वर दयाराम मोरे--७५४८--२५०००

युवराज जाधव (संभा आप्पा)--२११७७--२५०००

अब्दुल शकूर देशपांडे--१६०६--२५०००

अहमद खान--१९०१--२५०००

करण पवार--३९८३-२५०००

ॲड. नामदेव पांडुरंग कोळी--१२२४--२५०००

संदीप पाटील--१११०--२५०००

महेंद्र देवराम कोळी--२४७६--२५०००

मुकेश मुलचंद कोळी--३३७०--२५०००

ललीत (बंटी) शर्मा--४१९२--२५०००

ॲड. विजय बाबूलाल दाणेज--३४०४--२५०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT