Maize crop destroyed by fire in farmer Dagdu Patil's field. esakal
जळगाव

Jalgaon News : 6 एकरवरील मका आगीत खाक; शेतकऱ्याचे 9 लाखांचे नुकसान

Jalgaon : विद्युत रोहित्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मांदुर्णे शिवारातील सहा एकरावरील मका गुरुवारी (ता. २) दुपारी सव्वादोनच्या सुमारास जळून खाक झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : विद्युत रोहित्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मांदुर्णे शिवारातील सहा एकरावरील मका गुरुवारी (ता. २) दुपारी सव्वादोनच्या सुमारास जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे नऊ लाखांचे नुकसान झाले. या घटनेमुळे उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ()

मांदुर्णे (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी दगडू पाटील यांच्या गट क्रमांक २८२/१, २८२/२ या क्षेत्रातील सहा एकर मक्याचे साडेचार लाखांचे, तर पिकाला पाण्यासाठी लागणारे ठिबक सिंचन सहा एकर तीन लाख, तर दीड लाखाचा चारा, असे सुमारे ९ लाखांचे नुकसान झाले. विद्युत रोहित्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागली. मका पिकाला लागलेल्या आगीने थाेड्याच वेळात रौद्ररूप धारण करून शेतकऱ्याचे सहा एकर मका व ठिंबक खाक झाले. (latest marathi news)

भरपाई मिळण्याची मागणी

तालुक्यात चारा व पाण्याची खुप टंचाई आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करून पिकाला पाणी दिले. मात्र, शेतात पंचनामा करण्यासाठी कुणीही न फिरकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नुकसानीमुळे शेतकरी पुरता खचला आहे. प्रशासनाने पंचनामा करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT