farming esakal
जळगाव

Maharashtra Agriculture Day: शेतीकामांसाठी अडीच लाखापर्यंत अनुदान : कृषी विभाग; सावकाराकडे व्याजाने पैसे घेण्याची गरज नाही

Jalgaon News : पिकांसाठी नियोजन करीत असताना शेतकऱ्यांना बराच खर्च येतो. हा खर्च शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा नसतो. शासन या कामासाठी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान देते.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतकरी खते, बी-बियाण्यांसह मोटार, वीज कनेक्शन, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, सोलार पंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासह अनेक बाबींवर खर्च करून पिकांसाठी नियोजन करीत असतो. यासाठी शेतकऱ्यांना बराच खर्च येतो.

हा खर्च शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा नसतो. शासन या कामासाठी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान देते. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (jalgaon Maharashtra Agriculture Department subsidy marathi news)

अनेक शेतकरी वेळप्रसंगी पोटाला चिमटा देऊन शेतीत खर्च करतो, तर काही शेतकरी पैसे नसल्याने सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन शेतीकामे करीत असतात. दरम्यान, ते कर्जबाराजीदेखील होतात. मात्र, यापुढे शेतकऱ्यांना खिशातून पैसे न खर्च करता किंवा सावकाराकडे हात न पसरता त्यांना शेतीमधील विविध कामांसाठी अडीच लाखांचे अनुदान दिले जाणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज

शेतकऱ्यांना अडीच लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलवर जाऊन शेतीचा सातबारा, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक देऊन नोंदणी करायची आहे. (latest marathi news)

असे आहे अनुदान?

*सिंचन विहिरीसाठी अडीच लाख : विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना शेतात विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जात आहे. ही शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू आहे.

*विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार : पावसाळ्यात नदीकाठावरील विहिरीत गाळ साचतो, तसेच पडझड होते. अशा विहिरींची दुरुस्तीसाठी शासन ५० हजार रुपये अनुदान देते.

*इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी १० हजार : महावितरण कंपनीकडून शेतीसाठी वीज कनेक्शन घेण्यासाठी शासनाकडून दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. पिकांप्रमाणेच सोलार पंपासाठी शासनाकडून १० हजार रुपये अनुदान दिले जात आहे.

*ठिबक सिंचनसाठी ५० हजार : पाणीपातळीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. ठिबक सिंचनासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.

*तुषार सिंचनसाठी २५ हजार : तुषार सिंचनामुळे पिकांसाठी पाणी कमी लागते. त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना २५ हजार रुपये अनुदान देण्यात येते.

"शेतकऱ्यांनी शेतीकामे करताना अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. शेतीचा सातबारा, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक देऊन नोंदणी करायची आहे."

- के. एम. तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

SCROLL FOR NEXT