Officials of Pujari Bhope community while giving a statement to Provincial Magistrate Bhushan Ahire. esakal
जळगाव

Jalgaon News : स्मशानभूमीत सुविधा करा! पुजारी भोपे समाजाची मागणी; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Jalgaon News : समाजाच्या दफन विधीसाठी परधाडे रोडवरील पालिका हद्दीतील जागा अनेक वर्षांपासून आहे. तेथे दफनविधी केले जातात.

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील महानुभाव पंथ, पुजारी भोपे व उपदेशी समाज बांधवांनी स्मशानभूमीची जागा नावे करून तेथे विविध सुविधांची मागणी करणारे निवेदन प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले आहे. (Make facilities in cemetery Demand of Pujari Bhope community)

निवेदनाचा आशय असा, की महानुभाव पंथ, पुजारी भोपे समाजाचे बहुसंख्य कुटुंब येथे वास्तव्यास असून, विविध सण, उत्सव होतात. समाजाच्या दफन विधीसाठी परधाडे रोडवरील पालिका हद्दीतील जागा अनेक वर्षांपासून आहे. तेथे दफनविधी केले जातात.

त्या ठिकाणी पालिकेने पाणीपुरवठा योजना योजनेचे बांधकाम व कचरा डेपो तयार केला आहे. त्यामुळे येथे दफनविधी केलेल्या ठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने समाजाच्या भावनांना ठेच पोचली आहे. ही जागा समाजाच्या दफन विधीसाठी वापरात असली, तरी ती अजून समाजाच्या नावे लागलेली नाही. (latest marathi news)

ही जागा समाजाचे नावे लावण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. दफनभूमीत जाण्यासाठी रस्ता, बसण्यासाठी जागा व शेड, विजेचे काम व दिवे, संरक्षक भिंत, पाणी, देखभाल व दुरुस्ती या सुविधा उपलब्ध करून देऊन समाजास न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर मिलिंद पुजारी, ॲड. सुदर्शन पुजारी, दीपक पुजारी, विलास खेडकर, प्रशांत पुजारी, चुडामण पुजारी, गोविंद पुजारी, अजय पुजारी, प्रकाश पुजारी, भिका पुजारी, तुषार पुजारी, विजय पुजारी आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT