Marigold flowers for sale in the market on the occasion of Vijayadashami festival. esakal
जळगाव

Dussehra 2024 : विजयादशमीच्या खरेदीसाठी बाजार फुलला; सिमोल्लंघनासाठी जळगावकर सज्ज

Dussehra : साडेतीन मुहूर्तांपर्यंत पूर्ण मुहूर्त असलेला विजयादशमी अर्थात ‘दसरा’ सणाला नवीन वस्तू, सोने खरेदी, गृहप्रवेश, नवीन कार्याचा शुभारंभ केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नवरात्रोत्सवाचा महत्त्वाचा दिवस म्हणजे विजयादशमी’ होय. साडेतीन मुहूर्तांपर्यंत पूर्ण मुहूर्त असलेला विजयादशमी अर्थात ‘दसरा’ सणाला नवीन वस्तू, सोने खरेदी, गृहप्रवेश, नवीन कार्याचा शुभारंभ केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.१२) विजयादशमीनिमित्त नवीन कपड्यांसह इतर वस्तू खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी झाली होती. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. (Markets flourish for Vijayadashami shopping citizens ready for Seemollanghana )

त्यातील गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया व तिसरा मुहुर्त ‘दसरा’ आहेत. दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त असतो. दसऱ्याच्या शुभूमुर्हूतावर आज अनेकांनी नवीन वाहने आरक्षित करून ठेवली आहेत. ती उद्या (ता. १२) मुहूर्तावर घरी नेली जातील. अनेकांनी नवीन वास्तू राहण्यास जाण्याचे ठरविले आहे. तर अनेकांनी नवीन दुकाने, उद्योगधंदे, नवीन फर्म सुरू करण्याचे सुनियोजित केले आहे. बाजारात आज अनेकांनी कुटुंबासह नवीन कपडे, पादत्राणे, नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या आहेत. तर उद्या (ता.१२) नवमी व दशमी एकत्र असल्याने नवमीच्या पूजेचे साहित्याचीही आज खरेदी झाली.

झेंडू वधारला

दोन दिवसांपूर्वी झेंडू फुलांचे दर चाळीस रूपये किलो होते. आज चांगल्या प्रतीचा झेंडू ७० ते ८० रूपये होता. काल व आज पाऊस पडल्याने झेंडूची फुले खराब होतील, असा अंदाज असल्याने ज्या फुलांना पाणी लागले आहेत, अशी फुले कमी दराने उपलब्ध होती. तर चांगल्या फुलांचा दर ८० रूपये होता. (latest marathi news)

मेहरूण परिसरात ‘सोनपक्षी’

अनेक व्यापारी बांधव विशेषत: सुवर्ण व्यावसायिक मेहरूण परिसरात विजयादशमीला सकाळी सोनपक्षी’ दिसतो. त्याचे दर्शन झाल्यास आगामी वर्ष आर्थीक दृष्ट्या चांगले जाते, असा म्हटले जाते. यामुळे उद्या (ता.१२) सकाळी मेहरूण परिसरात व्यापारी बांधवांची सोनपक्षी पाहण्यास गर्दी होणार आहे.

सोन्याच्या दरात एक हजारांची वाढ

विजयादशमीला सोने खरेदी शुभ मानली जाते. यामुळे या दिवशी सोन्याच्या दागिन्यांची, सोन्याच्या चिपची विक्री मोठ्या प्रमाणात होते. आज सोन्याच्या दरात प्रती दहा ग्रममागे एक हजारांची वाढ झाली आहे. गुरुवारी (ता.१०) सोने प्रतिदहा ग्रम ७४ हजार ८०० (विना जीएसटी) होते. आज (ता. ११) तोच दर ७५ हजार ८०० झाला आहे. चांदी गुरुवारी (ता.१०) ९० हजार प्रती किलो होती. आज ९२ हजार प्रती किलो (विना जीएसटी) असा दर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT