Kishor Patil esakal
जळगाव

Jalgaon News : कांगावा करणाऱ्या शिंदेंनी नैतिकता शिकवू नये : आमदार किशोर पाटील

Jalgaon : अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हक्काची कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा अत्यल्प किमतीत घशात घातली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शेतकरी पुत्र म्हणविणाऱ्या व शेतकरी हितासाठी कटिबद्ध असल्याचा कांगावा करणाऱ्या अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हक्काची कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा अत्यल्प किमतीत घशात घातली. अशा लोकांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. त्यांनी भारतीय जनता पक्षाची अंगावरील झूल काढून लढावे. त्यांना शेतकरी त्यांची दाखवतील, असे खुले आव्हान आमदार किशोर पाटील यांनी अमोल शिंदे यांना पत्रकार परिषदेतून दिले. (MLA Kishore Patil statement of Sindhis who do Kanguva should not teach morality )

श्री. शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या पीककर्ज धोरणासंदर्भात झालेल्या निर्णयाबाबत पत्रकार परिषद घेऊन आमदार पाटील जिल्हा बँकेचे संचालक असताना त्यांना शेतकऱ्यांबाबत काहीही देणे-घेणे नाही, असा आरोप केला होता. त्याचा समाचार घेण्यासाठी आमदार पाटील यांनी शुक्रवारी (ता. १४) दुपारी ‘शिवालय’ या आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

या वेळी रावसाहेब पाटील, गणेश पाटील, विकास पाटील, संजय पाटील (भडगाव), संजय गोहिल, शरद पाटे, वाल्मीक पाटील, किशोर बारवकर, चंद्रकांत धनवडे, बापू हटकर, जितेंद्र जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमदार पाटील यांनी शिंदे व वैशाली सूर्यवंशी यांचा चांगला समाचार घेतला. अमोल शिंदे ही भाजपमधील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यांच्यासोबत खऱ्या भाजपचा एकही पदाधिकारी नाही.

महायुतीत असतानाही ते माझ्या म्हणजे महायुतीसंदर्भात टीकात्मक वक्तव्य करीत आहेत. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची त्यांच्या वक्तव्यास संमती नसेल तर त्यांची त्वरित हकालपट्टी करावी. जिल्ह्याबाहेर शेती असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्जपुरवठा करणे कायदेशीर नसल्याचे पत्र मे २०२४ मध्ये बँकेचे विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांनी बँकेला दिलेले असताना शिंदे मात्र या विषयाचे भांडवल करण्याचा प्रयत्न करून दिशाभूल करीत आहेत. (latest marathi news)

शिंदे व वैशाली सूर्यवंशी यांच्या शिक्षण संस्थेतील सगळा सावळा गोंधळ मला ज्ञात असून, ते पालक व विद्यार्थ्यांचे वार्षिक शुल्क, गणवेश, बूट, शैक्षणिक साहित्य या माध्यमातून आर्थिक लूट करीत आहेत. त्यांच्या महायुतीविरोधातील कृत्यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, मंत्री महाजन यांना सविस्तर माहिती देणार असून, भाजप पदाधिकाऱ्यांची जर अमोल शिंदे यांच्या भूमिकेला मंजुरी नसेल तर त्यांची त्वरित हकालपट्टी करावी.

बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांचा पैसा जमा करून तो पैसा फक्त आपले काका व आईसाठी वाटण्याचे पाप शिंदेंनी केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत आमदार पाटील म्हणाले, की माझ्यासह संपूर्ण महायुती जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीचे समर्थन करीत असून, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिंदेंची महायुतीच्या विरोधात भूमिका

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याविरोधात अमोल शिंदे यांनी काम केल्याचा आरोप करून माजी खासदार उन्मेष पाटील व करण पवार यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशप्रसंगी अमोल शिंदे हेही ‘मातोश्री’वर होते.

परंतु, उद्धव ठाकरे यांनी पाचोरा विधानसभेची उमेदवारी वैशाली सूर्यवंशी यांना अगोदरच जाहीर झाली असल्याचे सांगितल्याने ते ‘मातोश्री’च्या मागच्या दाराने पळून आले. मी मुंबईला नसून इंदूरला आलो आहे, असा खोटा कांगावा केला. त्यामुळे यांची भाजपवरील श्रद्धा आम्हाला ठाऊक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Flood Relief : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन हजार कोटी, मंत्री मकरंद पाटील; २३ जिल्ह्यांतील ३३ लाख शेतकऱ्यांना मदत

Madhya Pradesh : मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी केले ओरछामध्ये श्रीराम राजा दरबारचे भूमिपूजन; ओरछातील विकासकामांचा घेतला आढावा

Uttar Pradesh Government : कमी खर्चात घ्या 'नैनीताल'ची मजा; उत्तर प्रदेश सरकार विकसित करत आहे नवे पर्यटनस्थळ

Breakfast Recipe: कोबी न खाणारेही आवडीने खातील असा भन्नाट बनवा सकाळचा नाश्ता, लगेच लिहून ठेवा रेसिपी

आजचे राशिभविष्य - 19 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT