Jalgaon Monsoon Season esakal
जळगाव

Jalgaon Monsoon Season : जिल्ह्यात रिपरिपने जनजीवन विस्कळित; आतापर्यंत 58 टक्के पाऊस

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाच्याा रिपरिपने जनजीवन प्रभावीत झाले आहे. सोमवारी (ता. २९) सकाळी सर्वत्र पावसाचा जोर होता.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाच्याा रिपरिपने जनजीवन प्रभावीत झाले आहे. सोमवारी (ता. २९) सकाळी सर्वत्र पावसाचा जोर होता. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. यामुळे नागरिकांना नियमित कामे करताना अडचणी आल्या. सततच्या पावसाने बहुतांश रस्त्यांत खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५८.५ टक्के पाऊस झाला आहे. (58 percent rainfall so far)

विदर्भ, मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे हतनूर प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यामुळे हतनूर धरणाचे सोमवारी दुपारी १६ दरवाजे उघडले आहेत. तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हतनूर धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्याने तापी नदीत पाणी सोडले जात आहे.

यामुळे तापी नदीला पूर आला आहे. रात्री अजून हतूनर धरणातील पाणी वाढल्यास धरणाचे अजून दरवाजे उघडण्यात येतील. यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठी राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.

तालुकानिहाय झालेला पाऊस असा (टक्केवारीत)

जळगाव--७३.६

भुसावळ--६९.६

यावल--५९.५

रावेर--४१.२

मुक्ताईनगर--५३.९

अमळनेर--५८.८

चोपडा--६४.३

एरंडोल--५७.८ (latest marathi news)

पारोळा--५५.१

चाळीसगाव-- ५४.०

जामनेर--५८.७

पाचोरा--५५.९

भडगाव--५६.२

धरणगाव--४९.९

बोदवड--६५.२

एकूण--५८.५

हतनूर धरणाची आजची स्थिती

पाणी पातळी : २११.०४ मीटर

एकूण पाणीसाठा: २३७.०० दशलक्ष घनमीटर

एकूण पाणीसाठा टक्केवारी : ६१.०८ टक्के

विसर्ग : २५७० क्यूसेक (९० हजार ७६० क्यूसेक)

दरवाज्यांची सद्यस्थिती : १६ दरवाजे पूर्ण उघडे

"हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात सकाळपासून पाण्याचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडले आहेत. तापी नदीकाठच्या गावांना सकाळपासूनच सतर्कतेचा इशारा दिला आहे." - शशिकांत चौधरी, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: संदीप क्षीरसागरांना गळाला लावण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न? एका दगडात दोन पक्षी टिपण्याचा डाव

Pune News : औषधांची ऑनलाइन, बेकायदेशीरपणे विक्री; औषध विक्रेत्या संघटनांची बंदी घालण्याची मागणी

Eknath Shinde: विरोधकांच्या विरोधाची हंडी जनतेने फोडली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शरसंधान

Yermala News : संपूर्ण धाराशिव जिल्हा अतिवृष्टीने प्रभावीत झाला असताना राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशी दौरा दुटप्पी पणाचा

Latest Maharashtra News Updates : मुंबईत दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा जखमी; केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार, काहींची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT