Mango
Mango esakal
जळगाव

Mango Season : आंबे खाताय, मात्र अगोदर सुगंध घ्या! आरोग्यासाठी नैसर्गिकच बरा; कृत्रिम पिकलेला घातकच

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गुढीपाडव्यानंतर उन्हाची तीव्रता वाढताच शहरात सर्वच प्रकारचे आंबे मिळत आहेत. त्यामुळे आमरसाचा बेत शहरातच होत आहे. मात्र, व्यावसायिक गणित डोळ्यांपुढे ठेवून काही विक्रेते आंबे कृत्रिमरीत्या पिकवितात. असे आंबे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. (Mango Season)

त्यामुळे आंबे घेताना काळजीपूर्वक आणि पारखून, त्याचा सुगंध घेऊनच घेण्याची गरज आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करून कृत्रिमरित्या पिकविल्या जाणाऱ्या आंब्याच्या दुष्परिणामापासून वाचण्यासाठी घरच्या घरी आंबा पिकवणे शक्य आहे. फळबागायतदार शेतकरी एस. बी. पाटील म्हणाले, की बाजारातून किंवा थेट शेतकऱ्यांकडून कच्ची फळे विकत घ्या.

घरी वाळलेले गवत, पालापाचोळा, झाडांची पाने किंवा वर्तमानपत्रांच्या कागदामध्ये आंबा पिकविता येतो. आंब्यांना पाचट, गवताची धूळ लागून ते धूरकट होतात, हे टाळण्यासाठी बाजारात फळे पिकविण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान्यता असलेली इथ्रेल वापरता येते. गवत किंवा पाचटामध्ये आंबे पिकविण्यास ठेवण्यापूर्वी प्रतिलिटर पाण्यात दीड मिलिलिटर इथ्रेल मिसळावे.

त्या पाण्यात आंबे पाच ते दहा मिनिटे बुडवावेत. नंतर ते पिकविण्यासाठी ठेवावेत. यामुळे आंबे एक-दोन दिवसआधी पिकतात. इथ्रेलसोबतच एक ग्रॅम बाविस्टीन टाकावे. यामुळे आंबे देठाजवळ सडत किंवा खराब होत नाहीत. प्रक्रिया केलेले आंबे टिकविण्यासाठी पाचट किंवा गवतात ठेवावेत.

कागदात पिकवा आंबे

जमिनीवर पोते किंवा गोणपाट टाकून वर्तमानपत्राच्या कागदातही आंबे पिकविता येतात. जमिनीवर गोणपाट टाकून त्यावर वर्तमानपत्रांचे तीन-चार थर टाकावेत. त्यावर आंबे ठेवून पुन्हा पेपरचे थर द्यावेत.

असे चार-पाच थर आंबे पिकविण्याच्या ठिकाणी ठेवून चारही बाजूने पुन्हा हवाबंद राहतील, अशा पद्धतीने झाकून ठेवावेत. शक्यतो ते पत्र्याच्या खोलीत न पिकविता इतर ठिकाणी जेथे तापमान फार जास्त नाही, अशा ठिकाणी पिकवले तर फळांना चांगली चव, रंग आणि स्वाद येऊ शकतो.

कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे हानिकारक

सध्या बाजारात बरीच फळे कृत्रिमरित्या पिकवली जातात. त्यात सर्वाधिक प्रमाण आंब्याचे असते. कृत्रिमरित्या आंबे पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईड या घातक रसायनाचा वापर केला जातो. पावडर स्वरूपातील रसायनाने पिकवलेली आंबे खाल्ल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होतो. कागदात पावडर ठेवून त्याच्या छोट्या छोठ्या पुड्या त्या फळांमध्ये ठेवण्यात येतात.

असे आंबे दीन दिवसांत पिवळे पडतात. मात्र, आतून फारसे पिकत नाहीत. आद्रतेच्या सानिध्यात आल्यास कॅल्शिअम कार्बाईडमधून निघणाऱ्या ॲसिटिलीन गॅसमुळे फळांचा हिरवेपणा जाऊन आंबे पिवळे धमक दिसतात. मात्र, अशा फळांमध्ये वरून पिवळेपणा येत असला, तरी मध्ये रासायनिक बदल होणे अपेक्षित आहे, तो होत नही. त्यात साखर तयार होत नसल्याने फळांना गोडवा व सुगंध येत नाही. त्याऐवजी फळांचा वास घेतल्यानंतर उम्र वास येतो.

असा ओळखा फरक

कृत्रिमरित्या पिकवलेला

*पिवळाधमक चकचकीत

*बोटाने दाबल्यास नरमपणा जाणवत नाही

*साल टणक जाणवते

*कृत्रिम फळ असल्यासारखे दिसतात

*फळांच्या सालीवर चट्टे पडून ते लवकर खराब होतात

*फळांची चव आंबट. जी खाण्यासाठी न आवडणारी असते

*सुगंध न येता ठसका आणणारा उग्र वास

नैसर्गिकरित्या पिकविलेला

*दिसायला हिरवट, पिवळा

*साधारणतः फिकट रंगाचा

*याला फारशी चकाकी नसते

*त्यावर बारीक सुरकुत्या पडल्यासारख्या असल्याचे दिसून येते

*फळाचा गर पिकलेला असतो

*त्यामुळे बोटाने हलके दाबले, तरी बोटे त्यात दबतात

*तो नरम असतो

*सालीवर चट्टे न पडताही हा बरेच दिवस चांगला राहू शकतो

*आत आंबा रसाळ, गोड, चवीला मधुर असतो

*आंब्याजवळ जाताच त्याचा घमघमाट येतो.

*घरभर सुगंध दरवळतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT