The digital launch of Pradhan Mantri Uchchatar Shiksha Abhiyan project was done online on Tuesday by Prime Minister Narendra Modi.
The digital launch of Pradhan Mantri Uchchatar Shiksha Abhiyan project was done online on Tuesday by Prime Minister Narendra Modi. esakal
जळगाव

Jalgaon News : उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत उमविला 20 कोटींचा निधी; पंतप्रधानांच्या हस्ते डिजिटल लॉन्चिंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : देशातील सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आर्थिक मदत देणाऱ्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान प्रकल्पाचे डिजिटल लाँचिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मंगळवारी (ता.२०) करण्यात आले.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत उमविला २० कोटी रुपये जाहीर झाले आहेत. (Pradhan Mantri Higher Education Yojana)

भारत सरकाच्या शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षणाला बळकटी देण्यासाठी देशातील सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना १२,९२६.१० कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाला मान्यता दिली आहे.

या अभियानाचे डिजिटल लाँचिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला या योजनेत २० कोटी रुपये जाहीर झाले आहेत.

या डिजिटल लाँचिंगचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात करण्यात आली होती.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी हे थेट प्रक्षेपण पाहिले.

जवळपास तीनशे जणांनी याचा लाभ घेतला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी विद्यापीठाला जाहीर झालेल्या २० कोटी रूपयांमधून कोणती विकासकामे केली जाणार असल्याची माहिती सभागृहाला दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Results: नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी करणार? ठरणार दुसरे पंतप्रधान?

Jayant Patil : मतमोजणी प्रक्रियेत सावध राहा; जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना पत्र; फेरफार होण्याची भीती

National Cheese Day 2024 : नाश्त्याला झटपट बनवा चवदार मसाला चीज मॅक्रोनी, वाचा 'ही' सोपी रेसिपी

Maharashtra Lok Sabha Election Results Live : मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात; पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली

India Lok Sabha Election Results Live : प्रतीक्षा संपली! BJPने उघडले खातं... मोदी अन् राहुल गांधी यांच्या हृदयाचे वाढले ठोके

SCROLL FOR NEXT