Fabric fencing for protection of established onion nurseries. esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : 1200 एकरावर उभारल्या कांद्याच्या रोपवाटिका! खानदेशातील शेतकऱ्यांकडून लागवडीसाठी जोरदार तयारी

Agriculture News : आता जुलै महिना उजाळल्याने खानदेशातील कांदा उत्पादकांनी सारे (बारे) तयार करून कांद्याचे बी टाकून कांद्याच्या नर्सरी तयार केल्या आहेत

सकाळ वृत्तसेवा

गणपूर (ता. चोपडा) : खानदेशातील काही गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील कांदा लागवड केली जाते. या लागवडीपूर्वी सुमारे दीड ते दोन महिने अगोदर जमिनीत बी टाकून कांद्याच्या नर्सरी (रोपवाटिका) तयार केल्या जातात.

दरम्यान, आता जुलै महिना उजाळल्याने खानदेशातील कांदा उत्पादकांनी सारे (बारे) तयार करून कांद्याचे बी टाकून कांद्याच्या नर्सरी तयार केल्या आहेत. खानदेशात येत्या खरीप हंगामातील लागवडीसाठी किमान बाराशे एकर क्षेत्रावर अशा प्रकारच्या नर्सरी तयार झाल्याचा अंदाज आहे. (Jalgaon Onion nurseries set up on 1200 acres)

खानदेशातील धानोरा, अडावद, चौगाव, लासूर, गणपूर, गलवाडे, मराठे, मंगरूळ, माचला, किनगाव, नायगाव, रुखनखेडे, वटार, वडगाव, दहिवद, अमळगाव, इंधवे, दुसाने, बळसाणे, कर्ले, परसोळे, कढरे, छडवेल, फोफादे, निजामपूर, जैताणे, पिंपळनेर, खोरी, टिटाने, साक्री, सामोडे, बोरीस, शनिमांडळ यांसह चाळीसगाव, भडगाव, शहादा, तळोदा, धुळे, नंदुरबार या तालुक्यांतील काही गावांत खरीप कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

कांदा रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी दीड ते दोन महिने अगोदर कांदा बी टाकून रोपे तयार केले जातात. त्यासाठी एकरी किमान तीन किलो बियाणे टाकून ती रोपे तयार केली जातात. अलीकडच्या चार-पाच वर्षांत सरळ गादीवाफ्यावर बी पेरून त्याची विरळणी करून कांदा पीक घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, खानदेशात जैन इरिगेशन लिमिटेडच्या अंतर्गत सफेद कांद्याचे उत्पादनही घेतले जाते. मात्र, खानदेशात लाल, पुणेरी व चायना कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. (latest marathi news)

खूपच जिकरीचे काम!

खरीप हंगामात कांदा बियाणे टाकून नर्सरी तयार करणे ते रोप जगवणे व पुनर्लागवड करून कांद्याचे उत्पादन घेणे हे तसे जिकरीचे काम आहे. पावसाचे पाणी किती वेगाने व किती मिलिमीटर पडेल, याचा अंदाज घेणे कठीण झाल्याने बऱ्याचदा शेतकऱ्यांना यातून मोठा तोटाही संभवतो. तरीसुद्धा खानदेशात मोठ्या प्रमाणावर खरीप कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

खानदेशात गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचे रोप टाकणे सुरू झाले आहे. बऱ्याच भागांत हिंस्र पशु, गावाजवळच्या शेतांमध्ये कुत्रे, डुकरे यांचा त्रास होतो. त्यामुळे या नर्सरी वाचविण्यासाठी बरेच उपायही करावे लागतात. असे उपायही शेतकऱ्यांनी केले आहेत. यावर्षीच्या खरीप कांदा हंगामासाठी शेतकरी तयारीला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT