portion of bridge near Bhoite Nagar has also not been opened for traffic
portion of bridge near Bhoite Nagar has also not been opened for traffic esakal
जळगाव

Jalgaon News : पिंप्राळा रेल्वेपुलावरुन वाहतुकीचे ‘उड्डाण’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दोन- तीन वर्षांपासून सुरु असलेल्या पिंप्राळा व सुरत रेल्वेगेटवरील संयुक्त रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडवरुन कानळदा मार्गाला दोन मिनिटांत पोचविणाऱ्या या पुलाची भोईटेनगरकडील बाजूही वाहतुकीस खुली झाली असून पिंप्राळा, खोटेनगर, महामार्गावर जाणे सहज शक्य झाले आहे. पिंप्राळा रेल्वेगेट हा जळगाव शहराच्या अर्ध्या भागाला मुख्य शहराशी जोडणारा दुवा आहे. (Jalgaon Pimprala railway bridge opened for transport)

गेटच्या पलीकडे रांगेने भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, प्रेमनगर, एसएमआयटी, मुक्ताईनगर, निवृत्तीनगर पुढे गुड्डूराजा नगर महामार्गाच्या पलीकडे पिंप्राळा, हुडको, मार्गाच्या दुतर्फा दादावाडी, खोटेनगर, आहुजानगर, अष्टभुजा नगर आणि थेट गिरणा नदीपर्यंतचा परिसर शहराच्या हद्दीत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महामार्ग वगळता केवळ पिंप्राळा रेल्वेगेट हाच पर्यायी मार्ग होता.

अडचण अन्‌ गेटची आवश्‍यकता

जळगाव शहरात येण्यासाठी पिंप्राळा रेल्वेगेटचा अधिक वापर होत होता. मात्र, मध्येच रेल्वेच्या जळगाव-मुंबई रेल्वेलाइनवर असल्याने या मार्गावरील अविरत रेल्वे वाहतूक दिवसातून अनेकदा रेल्वेगेटवरील वाहतूक प्रभावित करत होती. रेल्वेगाड्यांची मालिकाच दिवसभरात असल्याने अनेकदा हे गेट अर्धा-पाऊण तास बंद असायचे. त्यामुळे गेटच्या दुतर्फा वाहनधारकांच्या रांगा लागत. त्यामुळे या गेटवर उड्डाणपूल होणे गरजेचे होते.

राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला. साधारणतः अडीच वर्षांपूर्वी त्याचे काम सुरू झाले. आता हे काम पूर्ण झाले. (latest marathi news)

कामाचा तपशील

जळगाव-शिरसोली स्थानकादरम्यान जळगाव जंक्शनलगत हा पूल होत आहे. ‘महारेल’ या एजन्सीद्वारे पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा एकच पूल मुंबई रेल्वेलाईन व पलीकडे पश्‍चिम मार्गावरील सुरत लाइनवरील ‘गेट कव्हर' करतो. पुलाला दोन ‘लेन' असून एकूण लांबी १.१ किलोमीटर आहे. पुलाच्या मुख्य मार्गालगत रिंगरोड, भोईटेनगरसह सुरत लाइन ‘क्रॉस' करून पुढे दोन्ही बाजूंनी समांतर रस्ते बनवण्यात आले आहेत.

पुलाची वैशिष्ट्ये अशी

० पुलासाठी‘कंपोझिट' स्टील गर्डर्सचा वापर

० आरसीसीचे ५४ गर्डर्स बसविण्यात आले

० पुलाच्या सुरक्षेसाठी ‘क्रॅश बॅरियर' प्रणाली

० ‘युटीलिटीज' व्यवस्था, तपासणी व दुरुस्ती, ‘युटीलिटी डक्ट'ची व्यवस्था

० रात्रीच्या दृष्यमाणतेसाठी दूरस्थ नियंत्रित ‘थीम'वर आधारित एलईडी पथदीप

० सजावट कमानींसाठी एलईडी दिव्यांची सुविधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT