Speaking at the press conference, former MLA Dr. B. S. Patil. Neighbors Tilottama Patil, Umesh Patil, Shyam Patil, Sachin Patil etc. esakal
जळगाव

Jalgaon Political News : विधानसभेसाठी पाचपेक्षा जास्त इच्छुक; डॉ. बी. एस. पाटील : पत्रकार परिषदेत मंत्र्यांवर आरोप

Jalgaon News : शरद पवार जो उमेदवार ठरवतील आणि त्यांचा शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न असतील, असे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षार्फे पाचपेक्षा जास्त उमेदवारांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. शरद पवार जो उमेदवार ठरवतील आणि त्यांचा शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न असतील, असे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (More than five aspirants for Assembly Dr BS Patil Allegations)

मंत्री अनिल पाटील यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष त्यांच्यावर टीका करताना डॉ. पाटील म्हणाले, की कोण मंत्री आहे? काय घोषणा केल्या? ही सर्व जुमलेबाजी आहे. प्रशासकीय मान्यता मिळाली म्हणजे निधी मिळाला, असा अर्थ होत नाही. मंत्र्यांनी घोषणा केलेले कोणते काम पूर्ण केले? नुकत्याच निधी जाहीर झालेल्या यादीत पाडळसरेचे नाव का नाही, याचा शोध घेतला पाहिजे.

माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, तिलोत्तमा पाटील, सचिन पाटील, प्रशांत निकम, उमेश पाटील, श्‍याम पाटील पक्षाकडून इच्छुक आहेत. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे फोटो सर्वांच्याच बॅनरवर झळकत असल्याने ते नेमके कोणाचे ते कळत नाही. (latest marathi news)

मात्र, ते आमच्यात आले तर त्यांचे स्वागतच आहे, असेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सचिन पाटील यांनी सांगितले, की बाजार समितच्या सभापतिपदाच्या निवडीत मंत्र्यांनी कार्यकर्त्यांसह मतदारांना फसविले आहे. एकही आमसभा घेतली नाही. अवैध व्यवसायचालक त्यांच्यामागे फिरत आहेत.

काही प्रवर्गाला लाभ होण्यासाठीच मंत्री काम करतात. शेतकऱ्यांना चुटे भुटे म्हणणाऱ्यांना मतदार निवडून देणार नाहीत. तिलोत्तमा पाटील यांना उमेदवारी मिळावी, ही आमची मागणी आहे. मात्र, आघाडीचा धर्म पाळला जाईल, असे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस डॉ. किरण पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT