Jalgaon Politics esakal
जळगाव

Jalgaon Politics : महाजन, पाटलांचे आव्हान खडसे मोडीत काढणार?

कैलास शिंदे

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांचे आव्हान आमदार एकनाथराव खडसे मोडून काढतील, असे बोलले जात आहे.

निवडणुकीवरील स्थगिती उठविली असून, १० डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांची जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत युती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत खऱ्या अर्थाने ‘राजकीय’ वर्चस्वाची लढाई होत आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय लढाई सुरू आहे. दूध संघात एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. राज्यात सत्तातंर झाल्यानंतर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार घेतला. मात्र, त्यावर खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायालयाने प्रशासक मंडळ अवैध ठरवून संचालक मंडळाकडेच कारभार दिला. मात्र, प्रशासकपदाचा कारभार हाताशी असताना, मंगेश चव्हाण यांनी संघातील माहिती घेऊन संघात अखाद्य तूप व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. मात्र, याप्रकरणी खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने आरोप फेटाळून लावला व ही चोरी झाली आहे.

याप्रकरणी कार्यकारी संचालकाच्या माध्यमातून पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. मात्र, फिर्याद घेण्यात आली नाही. त्यासाठी खडसे यांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलनही केले. त्यानंतर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी कार्यकारी संचालकासह काही जणांना अटक केली.

दूध संघ निवडणुकीअगोदर ही पहिली राजकीय लढाई दूध संघात सुरू झाली. संघात दुसरी राज्यातील सत्ताधारी गट व विरोधी गटाची प्रशासकीय डावपेचाची लढाई झाली. आता तिसरी राजकीय लढाई सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकारचे सहकार पॅनल आहे, तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल आहे.

दोन्ही गटांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे. मंत्री महाजन यांच्या गटात दोन मंत्री विद्यमान आमदार, माजी आमदार आहेत. तर श्री. खडसे यांच्या गटातही आमदार, माजी आमदार व माजी मंत्री आहेत. राज्यात सत्तातंर झाले. त्यातच शिवसेना फुटली. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार आणि पुरस्कृत एक, असे पाच आमदार फुटले आहेत. या फुटलेल्या आमदारांनीही आता शिंदे- भाजप गटात आपली ताकत लावली आहे.

जिल्हा दूध संघात ४४३ मतदार आहेत. मतदार कमी असले, तरी संपूर्ण जिल्ह्यातून मतदान आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीची ही राजकीय रंगीत तालीम मानली जात आहे.

दरम्यान, शिवसेना फुटल्यानंतर ही निवडणूक होत आहे. वास्तविक एवढ्या मतदारावर पक्षीय ताकद जोखली जात नसली, तरी एक वातावरणाचा कल कळून येतो. त्यामुळे आपले अधिपत्य दाखविण्यासाठी आता महाविकास आघाडी व भाजप-शिंदे गट सज्ज आहे. या लढाईमुळे जिल्ह्यातील राजकीय कल दिसून येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT