vote counting esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election: 4 जूनला अगोदर टपाली मोजणी! जळगाव, रावेर लोकसभेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; पोलिस बंदोबस्त राहणार

Lok Sabha Election 2024 : जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या प्रत्येक विधानसभानिहाय १४ मतमोजणी टेबल असतील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी १३ मेस झालेल्या मतदानानंतर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. या प्रक्रियेची पारदर्शक, कार्यक्षम तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. (Jalgaon Lok Sabha Election 2024 Postal counting before June 4)

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या प्रत्येक विधानसभानिहाय १४ मतमोजणी टेबल असतील. एका टेबलवर १ मतमोजणी प्रतिनिधी प्रत्येक उमेदवाराला नियुक्त करता येईल. तसे उमेदवारांना लेखी कळविले आहे. निवडणूक प्रशासनाकडून प्रत्येक टेबलसाठी एका सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

टपाली मतमोजणी १८ टेबलांवर

टपाली मतमोजणीसाठी जळगावसाठी १० आणि रावेरसाठी ८ टेबल ठेवले असून, तिथेही प्रत्येक टेबलनिहाय १ याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधी असतील. उमेदवारांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी आपापल्या ओळखपत्रासह सकाळी सातला मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थिती राहतील. (latest marathi news)

मतमोजणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी रिटर्निंग ऑफिसर पुरेशा संख्येने मोजणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील. यात राखीव जागा असतील. या अधिकाऱ्यांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी सखोल प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. मतमोजणीच्या दिवशी, अधिकारी पहाटे साडेपाचपर्यंत केंद्रावर पोहोचतील. त्यांचे फोटो ओळखपत्र घेऊन जातील आणि आरओ आणि एआरओच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करतील.

पोस्टल मतमोजणी अगोदर

ईव्हीएम मतदानापूर्वी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल. मतपत्रिका मतमोजणी व्यवस्थापनासाठी अतिरिक्त निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. यात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (एआरओ), एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे. मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असून, पारदर्शकतेसाठी या प्रक्रियेची संपूर्ण व्हिडिओग्राफी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT