Scaffolding in Yawal Forest Division esakal
जळगाव

Wild Animal Counting : वन्यप्राणी गणनेसाठी पूर्वतयारी; यावल वन विभागात 42 मचाण

Jalgaon News : वन विभागाकडून बुद्ध पौर्णिमेस वनातील करण्यात येत असलेल्या प्राणी गणनेसाठी, यावल वन विभागाने पूर्वतयारी म्हणून मचाण उभारण्यासह आवश्यक तयारी पूर्ण केली.

सकाळ वृत्तसेवा

यावल : वन विभागाकडून बुद्ध पौर्णिमेस वनातील करण्यात येत असलेल्या प्राणी गणनेसाठी, यावल वन विभागाने पूर्वतयारी म्हणून मचाण उभारण्यासह आवश्यक तयारी पूर्ण केली असून, यावल वन विभागात एकूण ४३ मचाण उभारल्याची माहिती यावल वन विभागाचे सह वन संरक्षक प्रथमेश हाडपे यांनी दिली आहे. (Preparations for wildlife census completed by Yawal Forest Department)

यावल वन विभाग अंतर्गत असलेल्या चोपडा वनक्षेत्र ३, वैजापूर वनक्षेत्र ७, अडावद वनक्षेत्र ४, देवगिरी क्षेत्रात ४, यावल पूर्व वनविभाग ७, यावल पश्चिम वनविभाग ६ , रावेर वनक्षेत्र १२ अशा एकूण ४३ मचाण उभारण्यात आल्या आहे. बौद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल व लख्खप्रकाशात जंगलातील प्राण्यांचे विविध थरार अनुभवण्याची संधी यावर्षीही जंगल सफारींना अनुभवता येईल.

एका मचाणवर पाच ते सहा व्यक्ती बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जंगलातील असलेल्या पानवट्यावर प्राणी पाणी पिण्यासाठी येत असताना तसेच जंगलात भटकंती करीत असताना प्राण्यांची गणना केली जाते. काही ठिकाणी ट्रॅप कॅमेराद्वारे सुद्धा गणना केली जाते. (latest marathi news)

नवखे निसर्गप्रेमी, निसर्ग अभ्यासक, विद्यार्थी यांनाही जंगलातील थरार अनुभवता येईल. यावल वन विभागात अस्वल, बिबट, सांबर, वाघ, चितळ, रेडकी, चौशिंगा, सायळ यासह विविध पक्षी, सरपटणारे प्राणी, तसेच दुर्मिळ प्राणी सुद्धा नजरेस पडतात.

वनविभागातील प्राणी गणना ही धुळे प्रादेशिक वन विभागाच्या वनसंरक्षक निनू सोमराज, वावर वन विभाग उपवनसंरक्षक जमीर शेख, सह वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वन रक्षक व वनमजूर काम करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT