Jalgaon crime news esakal
जळगाव

दवाखान्यात उपचाराच्या नावे कैद्यांची मद्य पार्टी; दारूच्या नशेत कारागृहात धिंगाणा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्‍हा कारागृहातील न्यायबंदी तथा अट्टल गुन्हेगार चेतन सुरेश आळंदे ऊर्फ चिंग्या याच्यासह त्याच्या साथीदारांनी उपचाराच्या नावे बाहेर येऊन यथेच्छ दारू पार्टी केल्याचे प्रकरण पुन्हा उघडकीस आले आहे. दारूच्या नशेत कारागृह कर्मचारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


जिल्‍हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील संशयित चेतन आळंदे ऊर्फ चिंग्या, न्यायबंदी भगवान लक्ष्मण सुरवाडे यांना वैद्यकीय उपचारासाठी नेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. शनिवारी (ता. १०) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुख्यालयातील कैदी पार्टी उमेश धनगर याच्यासह इतरांनी संशयित चेतन आळंदे व त्याचा साथीदार भगवान सुरवाडे अशा दोघांना सकाळी जिल्‍हा रुग्णालयात नेले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर परत जिल्‍हा कारागृहात आणल्यावर त्यांच्या तोंडातून दारू पिल्याचा वास येत असल्याने जेल गेटवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने कारागृह अधीक्षक एस. पी. कवार व तुरुंगाधिकारी गजानन पाटील यांना फोन करून घटनेची माहिती दिली. तातडीने दोन्ही अधिकारी दाखल झाल्यावर दारूच्या नशेतील चेतन आळंदे यास कारागृहात दाखल करवून घेण्यास नकार देण्यात आला.

कारागृह अधीक्षकांच्या सूचनेनुसार, तसेच रात्रपाळी रजिष्टरवर स्वाक्षरी करण्याचे सांगितल्याने दोन्ही न्यायबंदींना कारागृहात घेण्यात आले. त्यानंतर चेतन आळंदे ऊर्फ चिंग्या व त्याचा साथीदाराने दारूच्या नशेत जोरजोरात आरडाओरड करून आम्हाला उशिरा का घेतले म्हणून कारागृह कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच ‘येत्या २४ तासांत तुझा मर्डर करेल’, अशी धमकी दिल्याप्रकरणी कारागृह कर्मचारी राहुल राम घोडके यांच्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दारूची पार्टी झालीच कशी?
मुख्यालयातील कर्मचारी उमेश धनगर व त्याच्यासह इतर कैदी पार्टी न्यायबंदी चेतन आळंदे व भगवान सुरवाडे यांना कारागृहातून काढून जिल्‍हा रुग्णालयात घेऊन गेले होते. पोलिसांच्या ताब्यात असताना संशयिताने दारूची पार्टी केल्याने कैदी पार्टीतील पोलिस कर्मचाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. न्यायबंदी चेतन आळंदे ऊर्फ चिंग्या याने यापूर्वीही कारागृहातून न्यायालयात येता-जाता पोलिस बंदोबस्तात पार्ट्या केल्याचे आढळून आले आहे. तशा स्वरूपाचे गंभीर गुन्हेही दाखल असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT