The deplorable condition of the roads in the new settlements at Erandole. esakal
जळगाव

Jalgaon Rain: पहिल्याच पावसात नववसाहतींमधील रस्त्यांची दुरवस्था! गटार अन नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे सर्वत्र चिखल

Jalgaon News : पालिका प्रशासनाने त्वरित रस्त्यांवर खडीचा कच टाकावा अशी मागणी महिलांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : काल मध्यरात्री झालेल्या पहिल्याच पावसात शहरातील सर्व नवीन वसाहतींतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नवीन वसाहतींमध्ये सुरु असलेले गटारींचे कामे तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे सर्व रस्त्यांवर सर्वत्र चिखल झाल्यामुळे रहिवाशांना पायी चालणे देखील मुश्कील झाले आहे. पालिका प्रशासनाने त्वरित रस्त्यांवर खडीचा कच टाकावा अशी मागणी महिलांनी केली आहे. (Jalgaon Rain Bad condition of roads in first rain)

शहरात काल मध्यरात्रीपासून जोरदार पाउस झाल्यामुळे नवीन वसाहतींमधील रस्त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. सद्यस्थितीत नवीन वसाहतींत सुमारे एक वर्षापासून नवीन गटारी आणि नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. नवीन वसाहतींमध्ये लाखो रुपये खर्चून कॉंक्रीटीकरण झाले.

मात्र नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी पक्के सिमेंट रस्ते फोडून त्याखाली असलेली काळी माती रस्त्यांवर टाकल्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. काळ्या मातीच्या चिखलामुळे अनेक जण पाय घसरून पडल्यामुळे नाराजी आहे. गटार कामांमुळे सांडपाणी वाहून जाण्यात अडचण असल्यामुळे सर्वत्र डासांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (latest marathi news)

विद्यार्थ्यांना दांडी

चिखलात तीन ते चार स्कूलबस ठिकठिकाणी फसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जात आले नाही. दुचाकी घसरत असल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. गटारीचे व नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामही अत्यंत संथ सुरु असल्याने नागरिकांत संताप आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून अद्याप पूर्ण पावसाळा बाकी आहे. कर भरुनही नवीन वसाहतींमध्ये पुरेशा प्रमाणावर सोयी व सुविधा मिळत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली.

पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांची सहा महिन्यांपूर्वी बदली झाली असून त्यांच्या रिक्त पदावर अद्याप नियुक्ती नाही. प्रभारी मुख्याधिकारी म्हणून जनार्दन पवार यांच्याकडे पदभार आहे. पालिकेवर तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT