Rain  esakal
जळगाव

Jalgaon Rain News : एरंडोल तालुक्यातील पावसाबाबत महसूल प्रशासनातर्फे दिशाभूल! जोरदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

Jalgaon News : उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : शहरासह ग्रामीण भागात रविवारी (ता. २३) मध्यरात्रीपासून सोमवारी (ता. २४) पहाटेपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस पडल्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Rain Misled by revenue administration regarding rain in Erandol taluka )

शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्यानंतरही महसूल प्रशासनातर्फे अत्यल्प पावसाची नोंद करून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. शेतकरी रोज पावसाची प्रतीक्षा करीत होते.

सुमारे दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी मध्यरात्री पावसाचे आगमन झाले. सुमारे चार ते पाच तास तालुक्यात सर्वत्र पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे भालगाव, खडके लघु तलावात काही प्रमाणात जलसाठा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (latest marathi news)

शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या अंजनी प्रकल्पातही पाण्याची आवक काही प्रमाणात सुरू झाली. सद्यस्थितीत अंजनी प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा असून, मृत जलसाठ्यातून शहराला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरात सुमारे चार तास जोरदार पाऊस झाल्यानंतरही महसूल प्रशासनातर्फे एरंडोल येथे केवळ सात मिलिमीटर पाउस झाल्याची नोंद करून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.

शहरात कमी पावसाच्या नोंदीमुळे पर्जन्यमापक यंत्राच्या सदोषपणाबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. रविवारी एरंडोल येथे केवळ सात मिलिमीटर, रिंगणगाव मंडलात बारा मिलीमीटर, कासोदा मंडलात २८ मिलिमीटर, तर उत्राण मंडलात शून्य मिलिमीटर पाऊस झाल्याचे महसूल प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT