Jalgaon Raver By election of 12 Gram Panchayats 5th June sakal
जळगाव

जळगाव : रावेरमधील १२ ग्रामपंचायतींची ५ जूनला पोटनिवडणूक

१३ ते २० मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील

सकाळ वृत्तसेवा

रावेर : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या १३ जागांसाठी ५ जूनला पोटनिवडणुका होत आहेत. अर्ज दाखल करण्यास १३ मेपासून सुरवात होणार आहे. रावेर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. १३ ते २० मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. यात सुट्टी वगळून अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननी २३ मेस, अर्ज माघारी अंतिम तारीख २५ मे, चिन्हवाटप व लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी २५ मेस प्रसिद्ध होईल व ५ जूनला मतदान, तर ६ जूनला मतमोजणी होईल.

ग्रामपंचायत निहायप्रभाग क्रमांक, आरक्षण व निवडणूक निर्णय अधिकारी असे : धूरखेडा- प्रभाग २ (सर्वसाधारण), निंभोरासीम- प्रभाग ३ (अनुसूचित जाती), खिर्डी बुद्रुक- प्रभाग १ (अनुसूचित जमाती), कोळोदा- प्रभाग १ (अनुसूचित जमाती), कोळोदा- प्रभाग ३ (अनुसूचित जमाती महिला), खिर्डी खुर्द- प्रभाग २ (सर्वसाधारण), बलवाडी- प्रभाग ३ (अनुसूचित जाती) या सात जागांच्या पोटनिवडणुकीसाठी खर्डीचे मंडलाधिकारी एम. बी. तडवी, अभोडा बुद्रुक- प्रभाग १ (अनुसूचित जमाती) निवडणूक निर्णय अधिकारी- वाय. आय. तडवी, मंडलाधिकारी रावेर, चिनावल- प्रभाग ६ (सर्वसाधारण) निवडणूक निर्णय अधिकारी- जे. डी. बंगाळे मंडलाधिकारी खिरोदा, मोरगाव खुर्द- प्रभाग ४ (अनुसूचित जमाती), निवडणूक निर्णय अधिकारी- व्ही. डबल्यू. पाटील, मंडलाधिकारी खानापूर, तासखेडा- प्रभाग १ (अनुसूचित जमाती), उदळी खुर्द- प्रभाग १ (अनुसूचित जमाती महिला), उदळी बुद्रुक- प्रभाग १ (अनुसूचित जाती) निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. आर. वानखेडे असतील, अशी माहिती प्रभारी तहसीलदार तथा निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT