Construction workers giving a statement to the municipality. esakal
जळगाव

Jalgaon News : कामगार दाखल्यासाठी 100 रुपये शुल्क; फैजपूर पालिकेकडून मनमानी वसुली

Jalgaon News : महाराष्ट्र शासनाचे कोणतेही आदेश नसताना येथील पालिका प्रशासन मनमानी कारभार करून कामगार दाखला देताना कामगारांकडून शंभर रुपये घेत आहे.

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर : महाराष्ट्र शासनाचे कोणतेही आदेश नसताना येथील पालिका प्रशासन मनमानी कारभार करून कामगार दाखला देताना कामगारांकडून शंभर रुपये घेत आहे. कामगाराकडून शंभर रुपये वसूल करणे बंद करावे व जन्म दाखल्याप्रमाणे वीस रुपये फी घेण्यात यावी, या मागणीसाठी येथील श्रमिक कोहिनूर कामगार संघटना. (Rs.100 fee for labor certificate Arbitrary recovery from Faizpur municipality)

एम. मुसा जनविकास असंघटित गवंडी कामगार संघटनेतर्फे उपविभागीय प्रांत कार्यालय व पालिकेत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना दरवर्षी नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीकडून कामगार असल्याचा दाखला घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात कोणतीही नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत कामगाराकडून दाखला देण्याची फी घेत नाही.

आणि राज्य शासन व इमारत मंडळाचे नि:शुल्कचे आदेश आहे. गेल्या २०१६ पासून फैजपूर पालिका कामगारांकडून ५० रुपये फी घेत आहे. जुलै २०२४ पासून पालिका प्रशासनाने दाखला देण्याचे शंभर रुपये केले आहे. शानाचे कोणतीही आदेश नसताना येथील नगरपालिका प्रशासन मनमानी कारभार करून कामगारांकडून शंभर रुपये का घेत आहे?

उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कामगारांकडून शंभर रुपये वसूल करणे बंद करावे व जन्म दाखल्याप्रमाणे वीस रुपये फी घेण्यात यावी, अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली. मागणी ३१ जुलैपर्यंत मान्य नाही झाली तर पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करणार, असे निवेदनात म्हटले आहे. (latest marathi news)

या निवेदनावर कामगारांच्या सह्या आहेत. हे निवेदन श्रमिक कोहिनूर कामगार संघटना एम. मुसा जनविकास असंघटित गवंडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकिर मलिक यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या हस्ते देण्यात आले.

"नगरपालिकेकडून बांधकाम कामगारांना ‘कामगार’ दाखला कोणतेही शुल्क न घेता देण्याचा शासनाचा आदेश असताना फैजपूर पालिका मनमानी कारभार करून शंभर रुपये घेत आहे. पालिकेचे नगर अभियंता तुमच्याने जे होईल ते करून घ्या, असे बेजबाबदार उत्तरे देत आहेत. त्यामुळे बांधकाम कामगार ३१ जुलैला पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत." - शाकिर मलिक, अध्यक्ष, श्रमिक कोहिनूर कामगार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT