जळगाव

जळगाव : पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये खरेदी उत्सव

सहकुटुंब खरेदीचा आनंद : झेंडूचा दर ६० रुपये, ऊस १०० रुपये जोडी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मंगलमय असा दिवाळी सण साजरा करण्यासाठी जळगावकर सज्ज ‍झाले आहेत. गुरुवारी (ता.४) लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळी असल्याने बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी पहावयास मिळाली. दिवाळीनिमित्त नवीन कपडे, घराची सजावट करण्यासाठी लागणाऱ्या साहित्‍यासह लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मीच्या मुर्ती, केरसुणी, दिवे, सजावटीसाठी झेंडूचे फुले, ऊस, खतावण्या खरेदीसाठी बुधवारी प्रचंड उत्साह बाजारपेठेत दिसून आला. झेंडू फुलाचा दर वधारला असून पन्नास ते साठ रुपये किलो दराने तर उसाच्या जोडीचा दर शंभर रुपये होता. शहरातील मुख्य बाजारपेठ टॉवर चौक, दाणाबाजार, महात्मा गांधी चौक परिसर ग्राहकांनी तुडूंब भरला होता.

दिवाळीची अनेकांनी खरेदी केली आहे. लहानांपासून घरातील ज्‍येष्ठांपर्यंत नवीन कपड्यांची खरेदी केली जात आहे. बाजारपेठांमध्ये रेडिमेड कपड्यांचे भरपूर पर्याय उपलब्‍ध करून दिले आहेत. काहींकडून कपडा खरेदी करत ड्रेस शिवून घेण्याकडे कल दिसत आहे. त्‍यामुळे शिवणकाम व्‍यावसायिकांकडेही कामाची रेलचेल आहे. आज शहरातील मुख्य बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्‍या होत्‍या. सायंकाळी उशिरापर्यंत खरेदीसाठी गर्दी बघायला मिळाली. एकीकडे बाजारात दिवाळीच्या विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

गोलाणी मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, फुले मार्केट, कापड बाजार, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व स्‍मार्टफोन विक्री दुकानांमध्ये वर्दळ बघायला मिळाली. महिलांचे ड्रेस मटेरीयलचे भरपूर पर्याय उपलब्‍ध असल्‍याने टॉवरसमोरील भागात, सेंट्रल फुले मार्केटमधील हॉकर्सकडे महिला ग्राहकांची लक्षणीय गर्दी झाली होती. लेहंगा, घागरा, साडी, पंजाबी ड्रेस अशा विविध वेशभूषांची खरेदी या ग्राहकांकडून सुरू होती.

दिवाळीत फराळ हा आकर्षणाचा केंद्र असतो. या पार्श्वभूमीवर रविवार कारंजा परीसरातील दुकानांमध्ये किराणा खरेदीची लगबग बघायला मिळाली. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता व्‍यावसायिकांनी दुकाने सुरु ठेवली होती. शहरातील बँक स्ट्रीट, नवीपेठ, नवीन बस स्थानक, मुख्य बाजारपेठ, कालिका माता मंदिर परिसर, गुजराल पेट्रोल पंपासमोर, खोटेनगर बसथांबा आदी भागात तयार फराळाची दुकाने थाटण्यात आली आहेत. जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग सहा जातो. यातील ‘आयटीआय’ जवळील महामार्ग, अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौफुली, बहिणाबाई उद्यानाजवळील अनेकांनी गृहसजावटीच्या वस्‍तूंची दुकाने लावली आहेत. घराला लावण्याच्‍या तोरणाचे भरपूर पर्याय येथे उपलब्‍ध झालेले आहे. या शिवाय कृत्रिम फुलांच्‍या माळा, आकाशकंदील, दिवे, रोषणाईसाठी दिव्‍यांच्‍या माळा असे गृहसजावटीचे भरपूर पर्याय व्‍यावसायिकांनी उपलब्‍ध करून दिले आहे. त्‍यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हॉकर्सनी व्‍यापले रस्‍ते

ग्राहकांच्या वाढत्‍या गर्दीसोबत रस्‍त्‍यावरील हॉकर्समुळे मुख्य बाजारपेठेत वाहन नेणे अशक्‍य झालेले आहे. प्रामुख्याने टॉवर चौकातून बळीरामपेठ, महात्मा गांधी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्‍ही बाजूंनी रस्‍त्‍यावर हॉकर्सनी दुकान थाटले होते. तर टॉवर चौक ते कोर्ट चौक भागातही अशीच काहीशी परिस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT