Sheikh Munjaja
Sheikh Munjaja  esakal
जळगाव

Jalgaon News : 10 पैकी 6 रुग्णांना बहिरेपणाचे विकार; सतत हेडफोनचा वापर, डी.जे.च्या आवाजाचा दुष्परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर महिन्याला होणाऱ्या तपासणीत धक्कादायक चित्र आढळून आले आहे. दहा रूग्णांमागे किमान सहा रुग्ण कानाच्या विकाराने ग्रस्त आहे. युवकांनी हेडफोनचा वापर न टाळल्यास लवकरच त्यांना पन्नास ते साठ टक्के बहिरे होण्याचा धोका आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय कर्णबधिर प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रमाच्या ऑडिओ लॉजिस्ट शेख मुनजजा यांनी ‘सकाळ’ ला दिली. (Jalgaon six out of ten patients suffer from ear disorders)

काल रविवारी (ता.३) जागतिक श्रवण दिन साजरा झाला. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. संगणकाच्या, धकाधकीच्या जीवनात सोशल मिडीयामुळे बहुतांश सर्वंच जणांकडे अन्ड्राइड मोबाईल असतो. अनेक जण हेडफोन लावून यू टयूबसह विविध प्रकारचे संगीत ऐकतात. दिवसभरातील किमान पाच ते सहा तास युवा पिढी हेडफोन लावते.

सोबतच लग्न समारंभात डी.जे.लावून नाचण्याचा प्रकार प्रत्येक लग्नात असतो. डी.जे.चा होणारा मोठा आवाज, कानाला सतत लागलेला हेडफोन यामुळे युवकांमध्ये कानाच्या विकाराचे प्रमाण वाढले आहे. त्या म्हणाल्या, दर आठवड्याला श्रवण दोष किती कमी आहे याबाबत तपासण्या करून रुग्णांना प्रमाणपत्र देतो. त्यात युवक, वृध्द व बालकांचा सामावेश असतो.

काहीसे अस्पष्ट ऐकायला येते. ही सार्वत्रिक तक्रार असते.मोबाईलवरील युटयूबची गाणी, हेडफोन लावून ऐकतात. रोजचे पाच ते सात तास. डी.जे.च्या मोठ्या आवाजावर किती वेळ नाचतात. लहानपासून युवक, वृद्धांना डी.जे.चा त्रास होतो. हृदयावरही परिणाम होतो. डीजे लावून नाचणे, कानात हेडफोन लावून गाणी ऐकण्याची फॅशन करताना आरोग्याची हेळसांड करतो.

कानाच्या पडद्यावर वेळीच उपचार घेतले नाहीतर भविष्यात बहिरे पणाचा धोका नक्कीच असतो. जागतिक आरोग्य संघटनेची श्रवणविषयक काळजीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ‘मानसिकता बदलत आहे: चला कान आणि श्रवण काळजी सर्वांसाठी एक वास्तविकता बनवूया " ही संकल्पना घेत, महत्त्व अधोरेखित करते. (latest marathi news)

जन्मपूर्व आणि प्रसवपूर्व कालावधीपासून वृद्धापकाळापर्यंत संपूर्ण आयुष्यभर श्रवणशक्ती कमी होण्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये, श्रवण कमी होण्याचे जवळपास ६० टक्के टाळता येऊ शकतात.

हे आहेत उपाय

डीजे व लाऊड स्पीकर च्या मोठ्या आवाजाच्या संपर्कात घट करण्यासाठी सुरक्षित ऐकण्याच्या धोरण करणे, ओटोटॉक्सिक ऐकण्याचे नुकसान टाळण्यासाठी औषधांचा तर्कसंगत वापर करणे, हेडफोन किंवा इअरबड वापरताना, आवाज वाजवी पातळीवर ठवणे, जर तुम्ही गोंगाटाच्या वातावरणात काम करत असाल किंवा तुमच्या श्रवणाबद्दल चिंता असेल मूल्यमापनासाठी ऑडिओलॉजिस्टला भेट द्या.

मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसारख्या आरोग्याच्या काही परिस्थितींमुळे श्रवणशक्ती कमी होऊ शकते, योग्य आहार, व्यायाम आणि औषधोपचाराद्वारे हे आजार नियमित ठेवणे. कान स्वच्छ करण्यासाठी इयर बर्ड्सचा वापर टाळणे, कारण यामुळे कानाच्या कालव्यात खोलवर जाऊ शकते आणि तुमच्या कानाच्या पडद्याचे संभाव्य नुकसान होऊ शकते. अस्वच्छ पाण्यात पोहणे टाळावे. वेळेवर कानाची ऐकण्याची तपासणी करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT