Pits dug by contractor for sewerage works. esakal
जळगाव

Jalgaon News : खड्ड्यात पडलेल्या दोघांचा विद्यार्थ्याने वाचविला जीव; अमळनेर येथील घटना

Jalgaon : शहरात भुयारी गटारीच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आलेले खड्डे पावसाने तुडुंब भरून त्यात दोन लहान मुले बुडालीत.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : शहरात भुयारी गटारीच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आलेले खड्डे पावसाने तुडुंब भरून त्यात दोन लहान मुले बुडालीत. मात्र, वेळीच एका आठवीच्या विद्यार्थ्याने खड्ड्यात उडी मारून त्यांना वेळीच बाहेर काढल्याने सुदैवाने दोघांचे प्राण वाचले. ही घटना नुकतीच घडली. याबाबत ठेकेदाराच्या कामातील हलगर्जीपणाबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील संत प्रसादनगरात भुयारी गटारीचे काम सध्या सुरू आहे. (student saved lives of two people who fell into pit at Amalner )

संबंधित ठेकेदाराने सुमारे पाच फूट खोल खड्डे या भागात करून ठेवलेले आहेत. त्यामुळे या परिसरातील पाण्याचा निचरा होत नाही. त्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खोदून ठेवलेले खड्डे पाण्याने पूर्णपणे भरले. दरम्यान गेल्या शुक्रवारी (ता.२७) संस्कार आशिष पारध्ये (वय ६) व वेदांत आशिष पारध्ये (वय ३) हे दोघे दुकानावर वस्तू घ्यायला बाहेर निघाले व गंमत म्हणून खड्डे बघायला गेले. त्यात एकाचा काठावर पाय घसरल्याने तो खड्ड्यात पडला, दुसरा त्याला धरायला गेला असता, तोही पाण्यात पडला व बुडाला. (latest marathi news)

खाली माती होती त्यामुळे ते गाळात फसले. मात्र, ही घटना राज गणेश महाजन (वय १३) या आठवीत शिकणाऱ्या मुलाने पाहिली. त्यामुळे त्याने लगेच पाण्यात उडी मारली व दोघांना बाहेर काढले. तेव्हा त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन जीव गुदमरला होता. आणखी थोडा वेळ गेला असता, तर अनर्थ घडला असता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला. अखेर ठेकेदाराने रात्री उशीरा साचलेल्या पाण्याचा निचरा केला. दरम्यान, राजने केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT