Veteran artiste Subodh Saraf participating in seminar in Khandesh Theater Festival, artists from Maharashtra's Comedy Fair Prof. Hemant Patil, Ramesh Bhole, Padmanabh Deshpande, Hanumant Survase etc. esakal
जळगाव

Khandesh Natya Mahotsav : नाटक प्रवाही राहण्यासाठी हवी कलावंतांची समांतर यंत्रणा

Khandesh Natya Mahotsav : नाटक प्रवाही राहण्यासाठी कलावंतांनी समांतर यंत्रणा तयार करावी तरच हौशी कलावंतांची नाट्य चळवळ गतिमान होईल असा सुर जिल्ह्यातील रंगकर्मींच्या परिसंवादात निघाला.

सकाळ वृत्तसेवा

Khandesh Natya Mahotsav : नाटक प्रवाही राहण्यासाठी कलावंतांनी समांतर यंत्रणा तयार करावी तरच हौशी कलावंतांची नाट्य चळवळ गतिमान होईल असा सुर जिल्ह्यातील रंगकर्मींच्या परिसंवादात निघाला.

ओबेनॉल फाउंडेशन प्रस्तुत व उत्कर्ष कलाविष्कारच्या १४ व्या नानासाहेब देविदास फालक स्मृती खानदेश नाट्य महोत्सवात हौशी नाटकांची चळवळ ही केवळ राज्य नाट्य स्पर्धेत अडकली आहे का ? याविषयावर परिसंवादात हा सूर उमटला. (Jalgaon Symposium at Bhusawal 14th Khandesh Theater Festival)

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी सुबोध सराफ होते. परीसंवादात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रा.हेमंत पाटील यांचा विशेष सहभाग होता. परीसंवादात विविध कलावंतांनी व्यक्त केलेली मते

रमेश भोळे (लेखक दिग्दर्शक, जळगाव) : नाट्य स्पर्धेच्या व्यतिरिक्त नाटकाचा प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे.आयोजक आणि कलावंतांच्या समन्वयातून एक मध्यवर्ती संस्था निर्माण होणे आवश्यक आहे.सातत्याने दर्जेदार नाटके सादर होण्यासाठी नाटकाचे अर्थकारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.

होनाजी चव्हाण (जननायक थिएटर, जळगाव ) : काही लोकांनी ती जाणून बुजून स्पर्धेत अडकवून ठेवली आहे.हौशी रंगभूमीची चळवळ ही वैचारिक दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ आहे.

प्रा.हेमंत पाटील (महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलावंत ) : अनेक मोठे कलावंत हौशी नाट्य स्पर्धांमधून पुढे आलेली आहेत. आजच्या हौशी रंगभूमीने सुद्धा व्यावसायिक दृष्ट्या सजग होणे गरजेचे आहे. प्रामाणिक नाटक करणाऱ्यांना शहरी प्रेक्षकांपेक्षा ग्रामीण भागातील रसिक जास्त सहकार्य करतात असा माझा अनुभव आहे. राज्य नाट्य स्पर्धा ही शिकण्यासाठी योग्यच आहे परंतु कलावंतांनी त्यात अडकून पडू नये.

पद्मनाभ देशपांडे (जिल्हा कार्यवाह,अखिल भारतीय नाट्य परिषद,जळगाव) : हौशी नाटकवाल्यांनी केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून राहू नये तर एकमेकांना मदत करून पुढे जावे. नाटक केवळ स्पर्धेपुरते नको तर सातत्याने व्हायला हवे. (latest marathi news)

हर्षल पाटील (कलावंत, परिवर्तन जळगाव) : स्पर्धेमुळे कलावंत समृद्ध होतात.अनेकांना मोठी संधी मिळते.राज्य नाट्य स्पर्धा वर्षातून एकदाच येते. त्यामुळे त्यात अडकून न पडता सतत क्रियाशील राहणे गरजेचे. चांगल्या दर्जेदार नाटकांची निर्मिती करून शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय त्याचे गावोगाव प्रयोग व्हावेत.

हनुमान सुरवसे (प्रयोगशील रंगकर्मी, जळगाव) : नाट्य कलावंत घडवण्यासाठी स्पर्धा ही आवश्यकच आहे.राज्य नाट्य स्पर्धा ही कार्यशाळात असते. त्यात नवीन कलावंत शिकता शिकता घडत असतात. परंतु आजचे नाटक खरोखरच स्पर्धेत अडकले आहे. नाटकाचे प्रयोग वेगवेगळ्या स्तरावर होणे गरजेचे आहे. स्पर्धेत जिंकणे हरणे महत्त्वाचे नसून शिकणे महत्त्वाचे आहे.

दीपक महाजन (कलावंत, जळगाव) : स्पर्धे व्यतिरिक्तही सातत्याने नाटके व्हावीत. प्रयोगांची संख्या वाढवावी. नाटकांची संख्या वाढल्याने सहभागी कलावंतांची संख्या वाढेल. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत नाटक पोहोचले पाहिजे. सर्व अंगांनी नाटकांची वाढ झाली तरच प्रेक्षकांची संख्या वाढेल.

तेजस गायकवाड (विनोदी अभिनेते) : स्पर्धेत अडकलेली नाट्य चळवळ बाहेर काढणे गरजेचे आहे.परंतु नाट्य स्पर्धेमुळे कलावंत म्हणून आपण कुठे आहोत हे कळतं म्हणून स्पर्धेत नियमित भाग घेणे ही तितकच महत्त्वाचे आहे.

अमरसिंग राजपूत (आय.एम.आर.नाट्य संस्था, जळगाव) : नाटक उत्तम दर्जाची गोष्ट आहे. नाटकामुळे माणूस घडतो रसिकांना घडवण्याचे नाटक प्रभावी माध्यम आहे. नाटक सादर होण्यासाठी प्रेरणा हवी. आताच्या काळात नाटकांचे मार्केटिंग महत्त्वाचे आहे.

नाटकांचा कमर्शिअल विचार व्हावा. असे मत मांडले. चर्चेत उत्कर्ष कलाविष्काराचे अध्यक्ष अनिल कोष्टी व सुशील पाटील सहभागी झाले होते. नाट्य समीक्षक आनंद सपकाळे व हारून उस्मानी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT