Cooler (file photo) esakal
जळगाव

Jalgaon Summer Heat : उन्हाची तीव्रता वाढताच जुने कुलर आले बाहेर

Jalgaon Summer Heat : शहरासह जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Summer Heat : शहरासह जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर घरातील जुने कुलर बाहेर निघू नागरिक त्याचा वापर करताना दिसू लागले आहे. सोबतच नवीन कुलर, ए.सी. यांना मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. (Jalgaon temperature is increasing cause new cooler AC demand for them is increasing)

वाढत्या उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी नागरिकांकडून कूलरला अधिक मागणी होत आहे. उन्हापासून गारवा मिळावा यासाठी नव्या कूलरच्या खरेदीकडे नागरिक वळले आहेत. काही नागरिकांनी घरातील कान्याकोपऱ्यात पडलेला जूना कुलर काढून त्याच्या दुरुस्तीचेही काम सुरू झाले आहे. कूलरची विक्री व दुरुस्ती याचा वेग उन्हाबरोबर वाढत आहे. कूलरमध्ये नवीन गवत टाकून कुलर बनविण्याकडे अनेकांचा कल असतो.

सध्या बाजारात कुलरसाठी ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. तसेच फ्रिज, एसी, आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. वाढत्या किमती असल्या तरी ग्राहक खरेदी करण्यास पसंती देत आहेत. फ्रीजच्या किमती दहा हजारांपासून सत्तर ऐंशी हजारांपर्यंत आहे. तर एसी’चा दर टनाप्रमाणे असतो. तीस हजारांपासून एक लाखापर्यंत ए.सी.उपलब्ध आहे.

शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही लोखंडी कुलरला मागणी वाढती आहे. मोठ्या प्रमाणात लोखंडी बॉडी असलेल्या तीन फूट कूलरला सर्वांत जास्त मागणी आहे. परिणामी इतर प्रकारच्या कूलरची मागणी घटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कूलूरच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढत्या आहेत. दोन ते अडीच फुटांपासून कुलर उपलब्ध आहेत. (latest marathi news)

अलनिनो’च्या इफेक्टमुळे यंदाचा उन्हाळा कड़क जाणार असल्याचे चित्र आहे. सध्या मार्चच्या पहिल्या आठवड्यांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे सत्यावरील दुपारची वर्दळ कमी झाली आहे. ठिकठिकाणी शीतपेयांची मागणी दिसत होवू लागली आहे.

फळांना मागणी वाढली

उन्हामुळे उसाचा रस, लिंबू शरबत, लस्सी, फळांच्या ज्यूसबरोबरच रसदार फळांची ज्यात चिकू, द्राक्ष, कलिंगड, खरबूज, मोसंबी, संत्रा, अननस, आदी रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिंगडमध्ये गोडवा असतो. ते पाणीदार असल्याने पाण्याची तहानही भागते. सध्या पंधरा ते वीस रूपये किलो असा दर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT