Banana esakal
जळगाव

Jalgaon News : ‘किसान रॅक’ने दर्जेदार केळीची देशभरात निर्यात शक्य! केळी उत्पादक, वाहतूकदारांची सोय

Jalgaon News : या पाठपुराव्यामुळे किसान रॅकच्या ‘जीएस एसएलआर’ रॅकमध्ये केळीमाल भरताना मालधक्का गजबजला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तब्बल सात वर्षांपासून केळी निर्यातीअभावी सुनसान पडलेल्या रावेर रेल्वेस्थानकावरील मालधक्का कालबाह्य होण्याच्या मार्गावर असताना, केळी फळबागायतदार युनियनचे प्रयत्न आणि जागरुक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार रक्षा खडसेंचा पाठपुरावा कामी आला. या पाठपुराव्यामुळे किसान रॅकच्या ‘जीएस एसएलआर’ रॅकमध्ये केळीमाल भरताना मालधक्का गजबजला. गेल्या काही वर्षांत रावेरमधील केळी उत्पादक, वाहतूकदारांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जातेय. (Jalgaon With Kisan Rack possible to export quality banana across country)

केळी व्हायची खराब

मालवाहतुकीची बोगी अथवा बीसीएन वॅगन्समध्ये भरलेली केळी ३६ तासांपेक्षा अधिक तास वाहतुकीस लागत असल्यामुळे उष्णतेने खराब होत होती. दिल्ली, लखनऊ, कानपूर आदी ठिकाणी ही केळी पाठविल्यानंतर त्यापैकी निम्म्याहून अधिक केळी खराब झाल्याने केळी उत्पादक, वाहतुकदारांना मोठा फटका बसत होता. या दरम्यान, व्हीपीयू वॅगन्स रॅक २४ तासांत दिल्लीत पोचू लागल्याने केळीचा दर्जा काहीअंशी बऱ्यापैकी टिकत होता.

हॉर्टिकल्चर ट्रेनला ‘ब्रेक’

राष्ट्रीय फलोत्पादन महामंडळ व कॉन्कोरच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पुढाकाराने एअर सर्क्युलेटेड हॉर्टिकल्चर ट्रेनमधून ताजीतवाणी केळी अवघ्या २० तासांत दिल्लीला निर्यात होत होती. कालांतराने राष्ट्रीय फलोत्पादन महामंडळाने भाडे सवलतीचे अनुदान बंद केल्याने २०१४ पासून या तिन्ही मातधक्क्यांवरून केळी निर्यात बंद पडली होती. (Latest Marathi News)

अखेर प्रयत्नांना यश

रावेर व सावदा रेल्वेस्थानक केळी फळबागायतदार युनियनने केळीची रेल्वे वाहतुकीसाठी तगादा लावून धरल्याने व खासदार रक्षा खडसे यांनी विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने फळभाज्या वाहतुकीसाठी सुरू केलेल्या किसान रॅकची थेट उपलब्धता करून देण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला. परिणामी, केंद्रीय रेल्वे मंडळाने रावेर व सावदा रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर किसान रॅकचे जीएस एसएलआर, असे एकूण २४ सेकंड क्लास मालवाहतुकीचे डबे उपलब्ध करून देण्याबाबत मान्यता दिली.

सात वर्षांनंतर न्याय

फळभाज्या वाहतुकीसाठी प्राधान्याने सुरू केलेल्या किसान रॅकने खऱ्या अर्थाने या सात वर्षांपासून धूळखात पडलेल्या रेल्वे मालधक्याला पुनर्जिवीत केले. या व्हीपीयू वॅगन रॅकमुळे केळी व अन्य फळभाजीपाल्याची सुरक्षित वाहतूक होऊ लागली. केंद्र सरकारने देशभरातील फळभाजीपाला पिकांच्या वाहतुकीसाठी ‘किसान रॅक’ सुरू करत त्यास अनुदानही दिले.

त्यामुळे सवलतीच्या दरात वाहतूक होत होती. आता या अनुदानाची तरतूद संपल्यानंतर अनुदान मिळणे बंद झालेय. त्यामुळे पूर्ण भाड्यासह केळीची वाहतूक या रॅकद्वारे केली जात आहे. अर्थात, संपूर्ण देशातील फळ, भाजीपाला पिकांबाबत ही सार्वत्रिक स्थिती आहे. त्यातून मार्ग काढून पुन्हा एकदा ‘किसान रॅक’चे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Vijay Wadettiwar: सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार; 'ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा केल्याचा आरोप'

Latest Maharashtra News Updates : अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण तूर्त स्थगित, मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर निर्णय

पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या १५०२४ पैकी ५०० बेघर लाभार्थीच गेले घरकुलात रहायला! देशातील सर्वात मोठ्या ‘रे नगर’ गृहप्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ९००० घरे तयार

SCROLL FOR NEXT