Covid 19 New Rule, Covid 19 New Rule In Pune, without mask pune, corona sakal
जळगाव

जळगाव | विनामास्क फिरणाऱ्या दांपत्याचा धिंगाणा

पोलिसांशी हुज्जत घातल्याने गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात कोरोना संक्रमणाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्‍हा प्रशासनातर्फे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. खेाटेनगरातील एका दाम्पत्याला पोलिसांनी थांबवल्यावर या दाम्पत्याने दंड तर भरलाच नाही. उलट पोलिसांशी हुज्जत घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात नमूद केल्याप्रमाणे, नारायण जगताप (वय ३६) व पत्नी दिपाली जगताप (वय ३०, रा. खोटेनगर, जळगाव) असे दोघेही त्यांच्या वाहनाने टॉवर चौकातून बाजाराकडे जात होते. याच वेळेस टॉवर चौकात विनामास्क नागरिकांवर कारवाई सुरू असल्याने पोलिस पथकाने जगताप दाम्पत्यास थांबवून दंडाची मागणी केल्यावर दोघांनी दंड भरण्यास नकार देत वाद घातला. दोघांना जवळच पेालिस ठाण्यात नेण्यात आल्यावर पत्नी दिपाली यांनी मोबाईल काढून त्याद्वारे शूटींग काढून आरडा- ओरड केली. तसेच, पती नारायण यांनी पोलिस वाळू वाल्यांकडून हप्ते घेतात.

आम्ही उपोषणाला बसणार अशी धमक दिली. कोरोना नियमांचे उल्लंघन आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पती- पत्नीविरुद्ध शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक अरुण सोनार करत आहेत.

दरम्यान, कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून विनामास्क फिरणारत असलेल्या नागरिकांवर कारवाइ करण्यात येत आहे. मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

Latest Marathi Breaking News : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील अमीर रशीद अलीची १० दिवसांची कोठडी एनआयएकडे

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुलाचं नाव अभिनय का ठेवलं? रेणुका शहाणे यांनी सांगितलं कारण, वाचून वाटेल अभिनेत्याचं कौतुक

SCROLL FOR NEXT