Temple of Bhavani Mata.
Temple of Bhavani Mata. esakal
जळगाव

Jalgaon News : कळमसरे येथे आज भवानीमातेचा यात्रोत्सव! नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

कळमसरे (ता. अमळनेर) : येथील भवानी मातेचा यात्रोत्सव मंगळवारी (ता. १६) होणार असून, दरवर्षी चैत्रशुद्ध अष्ठमिला हा यात्रोत्सव होत असतो. या यात्रोत्सवाला शतकी परंपरा असून, भाविकांची नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गावाच्या दक्षिणेला लहान भवानी मातेचे मंदिर असून, गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शहापूर रस्त्यालगत मोठ्या भवानी मातेचे मंदिर आहे. (Jalgaon Yatra festival of Bhavani Mata today at Kalamsare)

गेल्या शंभर वर्षांपूर्वी या दोन्ही भवानी मातेच्या मंदिरांची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. मोठी भवानी व लहान भवानी माता या दोन्ही बहिणी असून, जागृत देवस्थान असल्याचीही महती गावासह भाविकांकडून सांगितले जाते. या यात्रोत्सवादरम्यान गावासह बाहेरील भाविकही वरणबट्टीचा नवस या ठिकाणी फेडतात.

नवस पूर्ण झाल्याचाही भाविकांकडून बोलले जाते. यात्रोत्सवात मोठ्या भवानी मातेच्या मंदिरावर सर्वांत अगोदर मान देऊन यात्रोत्सवाला सुरवात होते. पहाटे मोठ्या भवानी मातेचा भक्त दंगल बडगुजर ध्वज चढवितात.

त्याचप्रमाणे लहान भवानी मातेच्या मंदिरावर श्रावण चौधरी यांच्या परिवाराकडून परंपरेनुसार ध्वज चढविला जातो. यानंतर महाआरती होऊन दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. लहान भवानी मातेचे भक्त गुलाब महाजन हे वर्षभर पूजा- अर्चा करतात.(latest marathi news)

अष्टमीच्या दिवशी गावातील माळी समाजातील सैंदाणे परिवाराची कुलदेवता इंदासीमाता व नवमीच्या माळी समाजातील वाघ परिवाराची कुलदैवत इंदासी माता यांचेही या ठिकाणी वेगवेगळे कुलदैवत मंदिराची स्थापना केली असून, गावात दरवर्षी सुमारे चाळीस ते पन्नास नवसाच्या मानता असल्याने प्रत्येक चौकात नवसाच्य मानता असतात.

यामुळे गावात पाहुणे मंडळींची मोठ्या प्रमाणात गर्दीही होते. दरम्यान, या यात्रोत्सवात विविध खेळण्यांची दुकाने, पाळणेवाले दाखल झाले असून, रात्री मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजनही केले आहे.

या दोन्ही भवानी मातेच्या मंदिरावर विद्युत रोषणाई केली असून, ग्रामपंचायतीने व कळमसरे महाराष्ट्र विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंदिरापर्यंत विजेची सोय केली असून, या यात्रोत्सवाला परिसरातील भाविकांनी उपस्थिती देऊन यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन किरणसिंह राजपूत यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT