Dead  esakal
जळगाव

Jalgaon News : शिरूड येथील युवकाने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon : तालुक्यातील शिरूड येथे घरात डुकरे घुसून अन्नधान्याचे नुकसान करतात.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील शिरूड येथे घरात डुकरे घुसून अन्नधान्याचे नुकसान करतात. त्यांना कोंडून ठेवा, असे सांगण्याचा राग आल्याने चौघांनी एकाला मारहाण केली, म्हणून त्याने रॉकेल टाकून जाळून घेतल्याची घटना मंगळवारी (ता. २५) दुपारी तीनच्या सुमारास घडली. विलास भाईदास घिसाडी, असे मृताचे नाव आहे. याबाबत चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ()

शिरूड येथील गणेश भाईदास घिसाडी व त्याचा भाऊ विलास भाईदास घिसाडी यांच्या घराच्या मागील बाजूला रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रवीण भुरा वडर व सुदाम भुरा वडर राहतात. त्यांची मोकाट डुकरे आजूबाजूच्या घरांमध्ये घुसून अन्न धान्याची नासाडी करतात, म्हणून त्यांच्यात वाद होते. मंगळवारी सकाळी विलास घिसाडी फापोरे येथे गेले होते. दुपारी तीनला विनोद वडर याच्या डुकरांनी पुन्हा अन्न धान्याची नासाडी केली, म्हणून विलास बोलायला गेला असता, विलासला चौघांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.

चौघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विलास याने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याने धुळे पोलिसांना चौघांविरुद्ध जबाब दिला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी बुधवारी (ता. २६) मृतदेह तहसील कार्यालयात आणला. मात्र, शिक्षक मतदारसंघाचे मतदान सुरू असल्याने मृतदेह आणणारी रुग्णवाहिका बाहेरच थांबविली.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी लावून धरली. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी पोलिस निरीक्षक विकास देवरे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत गणेश घसाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक करण्यात आली. उपनिरीक्षक अक्षदा इंगळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT