NIvrutti Patil esakal
जळगाव

Jalgaon News : भवरखेडेतील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू; 6 तासांनंतर मृतदेह काढला बाहेर

Latest Jalgaon News : निवृत्ती श्यामकांत पाटील (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर गुरुवारी (ता. १९) सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव : तालुक्यातील भवरखेडे येथे मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (ता. १८) दुपारी तीनच्या सुमारास घडली. निवृत्ती श्यामकांत पाटील (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर गुरुवारी (ता. १९) सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Youth of Bhawarkhede drowned in well)

गावात कीर्तन सप्ताहानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. निवृत्तीने बुधवारी दुपारी सप्ताह कार्यक्रमात जेवण करून ग्रामस्थांना पंगतीत जेवूही घातले. तेथून तो गावातील पंधरा ते वीस मित्रांसोबत पळासखेडा रस्त्यालगच्या एका शेतातील विहिरीत पोहायला गेला होता. निवृत्तीला पोहता येत नव्हते.

मित्र विहिरीत पोहत असताना त्यानेही पाण्यात उडी घेतली; परंतु विहीर पन्नास फूट खोल असल्याने त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचे मित्र पाण्यातून बाहेर आले; परंतु निवृत्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. निवृत्ती हा जळगाव येथे बीसीएचे शिक्षण घेत होता. विहिरीत पन्नास फुटांपर्यंत पाणी असल्याने निवृत्तीचा पाण्यात शोध घेणे कठीण जात होते. (latest marathi news)

चार वीजपंपांच्या सहाय्याने विहिरीचे सर्व पाणी बाहेर काढून तब्बल सहा तासांनंतर रात्री नऊच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. धरणगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गुरुवारी (ता. १९) सकाळी अकराच्या सुमारास भवरखेडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निवृत्तीच्या मागे आई, वडील व मोठा भाऊ आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, तलाठी जीवन खोकरे, पोलिसपाटील रेखा नंदकिशोर पाटील, सरपंच उगलाल पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. निवृत्तीच्या कुटुंबास आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT