KBCNMU held an invention research competition  esakal
जळगाव

Jalgaon News : प्लास्टिकपासून वीट, रोड तयार करणारे मॉडेल्स; विद्यापीठात आविष्कार स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : टाकाऊ प्लॅस्टिकपासून वीट तयार करणे, नैसर्गिक पॉलिमर पासून विविध वस्तू तयार करणे, मक्याचा कणसाचा दाणे विरहित टाकाऊ भागापासून फरफ्युरल तेल तयार करणे, नारीशक्ती वाहन, मधमाशी प्रकल्प, प्लास्टिकपासून रोड तयार करणे अशा विविध विषयांवरील नवकल्पकता आणि संशोधनवृत्तीला चालना देणारे प्रकल्प विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या संशोधक आणि शिक्षकांचे आविष्कार संशोधन स्पर्धेच्या निमित्ताने दिसून आले.(KBCNMU held an invention research competition jalgaon news)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळेतील विद्यार्थ्यांची आविष्कार संशोधन स्पर्धा शुक्रवारी (ता.२०) विद्यापीठात झाली. पदवीप्रदान सभागृहात सकाळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

यावेळी व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, डॉ. पवित्रा पाटील व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आविष्कार स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रा. पी.पी. माहुलीकर उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचे समन्वयक प्रा.जे.व्ही. साळी, डॉ. व्ही.एम. रोकडे, डॉ. एस. के. खिराडे आदींची उपस्थिती होती.

स्पर्धेत इकोफ्रेन्डली कीटकनाशके, व्हर्टीकल फार्मिंग, प्रदूषणावर उपाय, पर्यावरण शिक्षण, हिल वॉटर प्लॅन्ट, ज्ञान रचनेतून शब्द निर्मिती, पायथॉन साफ्टवेअर, फ्री डायनामो उर्जानिर्मित करून विद्युत निर्माण करणे, गुलाबाच्या पाकळ्यांपासून कीटकनाशक बनवणे, कोरोना काळात रा.से.यो.चे योगदान, ताणतणावासाठी योगा, रिमोट व्होटींग पद्धती, संगणकाचा तंत्रज्ञानात वापर, इस्राईल-हमास युद्ध, आदिवासी जीवन पद्धती आदी विषयांवर पोस्टर व मॉड्युल्स विद्यार्थी व संशोधक शिक्षकांकडून सादर करण्यात आले.

सूत्रसंचालन प्रा.जी.ए. उस्मानी यांनी केले. या स्पर्धेसाठी गठित केलेल्या विविध समिती मध्ये सहभागी प्रशाळातील शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

३९२ पोस्टर्स, १८ प्रकल्प

एकूण ४१० विद्यार्थी, संशोधक शिक्षक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये ३९२ पोस्टर्स व १८ मॉडेल्स यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगून विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन, वाणिज्य व व्यवस्थापन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सामाजिकशास्त्र, फार्मसी आदी विषयांमधील पोस्टर व मोड्युल्सची मांडणी सभागृहात केली होती.

पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी व शिक्षक तसेच कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेतील संशोधक शिक्षक या गटातील स्पर्धक मोठया उत्साहाने आपले संशोधन सादर करीत होते. त्यांच्या या संशोधनात नावीन्यता तर होतीच मात्र भविष्यातील संशोधनाची बीजे देखील दिसून येत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT