Khedekar Tanpure tomorrow in Jalgaon district news esakal
जळगाव

Jalgaon News : खेडेकर, तनपुरे उद्या जळगाव जिल्ह्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर व माजी कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांचा शनिवारी (ता. १९) जळगाव जिल्ह्यात जनसंवाद दौरा असून, ते जिल्ह्यातील विविध तालुक्यात भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत, अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील व उद्योग कक्षाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिली. (Khedekar Tanpure tomorrow in Jalgaon district news)

शनिवारी चाळीसगाव येथून जनसंवाद दौऱ्याला सुरूवात होणार असून, मथुराई डी. एड्. कॉलेजमध्ये सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत संवाद साधणार आहेत.

त्यानंतर गोंडगाव (ता. भडगाव) येथे पीडित कुटुंबाची भेट घेतील. पाचोरा येथे दुपारी ३ ते ५ राजीव गांधी टाऊन हॉल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे संवाद साधणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर जळगाव येथे सायंकाळी ६ ते ८ दरम्यान, जिजाऊ भवन, मराठा सेवा संघ कार्यालय, निवृतीनगर या ठिकाणी संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यातील मराठा सेवा संघाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, मराठा समाजासाठी लढणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी, व्यावसायिक, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी या संवाद दौऱ्यात मराठा समाजातील सद्यस्थितीतील समस्या आदी सामाजिक विषयांवर यावेळी चर्चा करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT