Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Hasan Mushrif news : गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट! कदम यांच्या अचानक बदलीमुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून मुश्रीफ गटाला धक्का मानला जात आहे.
Kolhapur Gokul Politics officer transfer

Kolhapur Gokul Politics officer transfer

esakal

Updated on

Kolhapur Assistant Dairy Registrar transfer : सहायक निबंधक (दुग्ध) या पदावर पंधरा दिवसांपूर्वीच हजर झालेले सुजय कदम यांची आज सायंकाळी तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या ठिकाणी शाहूवाडी येथील सहकारी संस्था उपनिबंधक कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती झाली. त्यांच्या जागी कदम यांची नियुक्ती झाली आहे. कदम काल दिवसभर मुंबईत होते. बदलीचे आदेश आज सायंकाळी आले. आजपासूनच त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याचे व बदल्या प्रशासकीय कारणाने केल्याचे आदेशात म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com