Abduction of sisters esakal
जळगाव

Jalgaon Crime : दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गणेश कॉलनी परिसरातील एका महाविद्यालयाजवळून नांद्रा येथील दोन सख्ख्या बहिणींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला. (Kidnapping of two sisters Jalgaon Crime Latest Marathi News)

नांद्रा (ता. पाचोरा) येथील दोन बहिणी सोमवारी (ता. ५) सकाळी जळगावात कामाच्या निमित्ताने आलेल्या होत्या. यातील एक १५ वर्षांची, तर मोठी बहीण १८ वर्षांची आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास गणेश कॉलनीतील एसएनडीटी महाविद्यालयासमोरून रिक्षात बसल्या. त्या रात्री उशिरापर्यंत घरीच परतल्या नसल्याने पालकांनी दुसऱ्या दिवशी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

पोलिसांनी गणेश कॉलनीतील एसएनडीटी महाविद्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणी दुपारी दोनला मुलींच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरेाधात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार तपास करीत आहेत.

फूस लावून पळविल्याचा संशय

दोन्ही ख्सख्या बहिणींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय असून, या दिशेन पोलिसांचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्यात येऊन या बहिणींना पळवून नेणाऱ्याचा शोध सुरू आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT