Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipal Corporation : मनपा व्यापारी संकुल गाळेभाडे तिढा सुटणार?

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : व्यापारी संकुलातील गाळेभाडे निश्‍चितीसाठी समिती नेमण्याबाबत महापालिकेतर्फे राज्य सरकारला पत्र पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानंतर ही समिती नियुक्ती करण्यात येईल. (letter will sent by Municipal Corporation to State Govt regarding appointment of committee jalgaon news)

महापालिकेच्या २७ व्यापारी संकुलांतील गाळेभाडे, तसेच त्याचा करार निश्‍चित करण्याचा प्रश्‍न प्रलंबीत आहे. शासनाने याबाबत २६ एप्रिलला अध्यादेश जारी केला होता.

त्यात त्यांनी महापालिकेचे गाळेभाडे व मालकी हक्क निश्‍चितीसाठी आयुक्त, सहाय्यक संचालक नगररचना, सहाय्यक निबंधक नोंदणी, सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन, अध्यक्षांनी निश्‍चित केलेली तज्ज्ञ व्यक्ती, उपायुक्त महापालिका, मालमत्ता विभागप्रमुख व अतिरिक्त आयुक्त, अशी सात जणांची समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत.

या समितीतर्फे गाळेभाडे निश्‍चिती व मालकी हक्काबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. यात गाळेभाडे निश्‍चित करताना रेडीरेक्नर दरावर तीन टक्क्यांपेक्षा अधिक आकारणी करू नये, तसेच रहिवासी गाळ्यावर रेडीरेक्नर दराच्या दोन टक्क्यांपेक्षा अधिक आकारणी न करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापालिकच्या २७ व्यापारी संकुलांतील दोन हजार ६०४ गाळेधारकांकडे तब्बल २५५ कोटी रुपये थकीत आहेत. या गाळ्यांचे भाडे व मालकी हक्काचा नवीन करारही प्रलंबीत आहे.

फुले मार्केटमधील २५३ गाळेधारकांनी भाड्याची पूर्ण रक्कम भरली आहे. त्यामुळे त्यांच्या गाळे नवीन कराराचा प्रश्‍नही प्रलंबीत आहे. समिती गठित झाल्यास गाळेभाडे व नवीन कराराचा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे.

"महापालिकेच्या व्यापारी संकुलांच्या गाळेभाड्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. अध्यादेशावर हरकतीची मुदत एक महिन्याची आहे. त्याचा निकाल लागल्यावर पुढील प्रक्रिया लवकर करण्याबाबतही आपण शासकीय स्तरावर पाठपुरवा करणार आहोत." -सुरेश भोळे, आमदार, जळगाव शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT