फरार महिलेस अटक  sakal
जळगाव

जन्मठेपेच्या शिक्षेतील फरारी महिलेस केले अटक

कोविड अभिवचन रजेवरून झाली होती गायब

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: नाशिक मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या महिला कैदी रजेवर सुटल्यानंतर फरार झाली होती. भडगाव पोलिसांत याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे निर्मलाबाई अशोक पवार (रा. टोणगाव, ता. भडगाव) यांना अटक करुन न्यायालयात हजर केले.

कोरोना महामारीच्या काळात गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यभर आणि देशभर शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कोविड अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. याच वेळी भडगाव येथील रहिवासी तथा खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या निर्मलाबाई अशोक पवार (वय ५१) यांनाही नाशिक कारागृहातून अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते.

ठरल्याप्रमाणे, निर्मलाबाई यांनी ५ जून २०२२ पर्यंत कारागृहात पोहचणे आवश्यक असताना त्या वेळेत पोहचल्या नाही. तसेच दिलेल्या पत्यावरुन गायब असल्याने त्यांच्याविरुद्ध भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाच्या सूचनेवरून संशयित महिलेचा शोध सुरु असताना ती, भडगाव येथे परतली असून पत्ता बदलून वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील महिला कर्मचारी रत्ना मराठे, रुपाली खरे, राजेंद्र पवार अशांसह पथकाला रवाना केल्यावर निर्मलाबाई पवार या टोणगाव (ता. भडगाव) येथे आल्या असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यावर निर्मलाबाईची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप अटकेतील निर्मलाबाई पवार (वय ५१) यांना दहा वर्षांपूर्वी (वर्ष २०११) मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात जिल्‍हा न्यायालयाने (१९ डिसेंबर २०१३) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून तेव्हापासून त्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होत्या. पॅरोल रजेवर सुटल्यानंतर वेळेत परतणे अपेक्षीत असताना फरार झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT