election
election  esakal
जळगाव

लोकमान्य-प्रगती पॅनल पंचवार्षिक निवडणूक पूर्ण क्षमतेने लढणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ग. स. सोसायटीची निवडणूक पूर्ण क्षमतेने लढण्याचा निर्धार रविवारी (ता. २४) झालेल्या बैठकीत लोकमान्य पॅनल व प्रगती पॅनलच्या वतीने करण्यात आला.

ग. स. सोसायटीच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत लोकमान्य प्रगती गटाची मनोमीलन सहविचार सभा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटना कार्यालय, जळगाव येथे लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. प्रगती गटाचे अध्यक्ष रवींद्र साळुंखे, प्रभाकर सोनवणे, अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी लोकमान्य गटाच्या नेतेपदी तत्कालीन ग.स. सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. येत्या काळात होऊ घातलेल्या ग.स. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत सभासदांना समोर संस्थेच्या सभासद हितासाठी ध्येय धोरणे आखण्यात आली. कमी व्याजदरात कर्ज, मयत सभासदास शंभर टक्के कर्जमाफी, कर्ज मर्यादा वाढ दिव्यांगांना विशेष कर्ज ठेवींवर विशेष योजना इत्यादी विविध देण्यात येतील.

अध्यक्ष पाटील, गटनेते पाटील, श्री. नेरकर, मुख्याधिकारी संघटनेचे पदाधिकारी सोनवणे, बी. टी. बाविस्कर, अनिल तळेले, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे समन्वयक सर्जेराव बेडिस्कर, जळगाव मनपा संघटनेचे अ. वा. जाधव, सुभाष मराठे, जिल्हा परिषद लेखा संघटना याचे सलीम तडवी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघटनेचे गाजरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संजय पाटील त्यांनी केले.

संभाव्य उमेदवार :

स्थानिक मतदार संघ ः डॉ. रवींद्र साळुंखे, राजेश पवार, अमित पाटील, प्रा. आर. एस. पाटील, योगेश नन्नवरे (महसूल). बाहेरील मतदारसंघ- अजित पाटील, विश्वास सूर्यवंशी (चाळीसगाव), विलास नेरकर(इमाव), डी. एन. पाटील (भडगाव), सुनील पाटील (पाचोरा), संजय पाटील (जामनेर), मुकेश बोरोले (रावेर), योगेश इंगळे (यावल/भुसावळ), ज्ञानेश्वर पाटील (मुक्ताईनगर /बोदवड), व. ना पाटील (एरंडोल- धरणगाव), विलास पाटील (पारोळा), मगन बाविस्कर (चोपडा), सुनील पाटील (पारोळा), महिला राखीव-

जागृती भास्कर पाटील-पवार (पारोळा) विजा/भज--कोमल जाधव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Qualifier 1 : दोन्ही अय्यरची अर्धशतके; केकेआरने हैदराबादला मात देत गाठली फायनल

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Pune Porsche Accident : पब चालविणे गंमत आहे का? पुणे पोर्शे अपघातप्रकरणी न्यायालयाचे आरोपींना खडेबोल

Sambit Patra : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरली, भाजपचे संबित पात्रा करणार तीन दिवस उपवास, नेमकं काय म्हणाले होते?

Moringa Powder : आडवी तिडवी सुटलेली ढेरी कमी करते या पानांची पावडर, जाणून घ्या मोरिंग्याचे पाणी पिण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT