govind sonavane with his startup product esakal
जळगाव

Jalgaon : ‘स्टार्टअप’मधून दरवळणारा सुगंध ‘पेटंट’च्या दिशेने

देविदास वाणी

जळगाव : नव्याने काही करण्याचा ध्यास असेल तर अनेक संकटे आल्यावरही आपण ती करू शकतो, हे निंभोरा (ता. रावेर) येथील युवकाने सिद्ध करुन दाखवलंय.. केळीच्या खोडावर (Banana Trunk) प्रक्रिया करुन त्यापासून बनविलेल्या अगरबत्तीतून (Agarbatti) दरवळणारा सुगंध आता पेटंटच्या दिशेने प्रवासाला निघालांय. (Making agarbatti from banana trunk young boy startup Jalgaon News)

गोविंदा हरी सोनवणे असे या तरुणाचे नाव. केळीच्या खोडापासून दररोज ४५ हजार अगरबत्ती तयार करून त्या विविध प्रकारच्या सुगंधात ठेवून त्याची विक्री करीत आहे. त्याचा हा नावीन्यपूर्ण उपक्रमाला विद्यापीठातील केबीसीएनएमयू सेंटरचे मदत केली आहे. त्याच्या ‘केळीच्या खोडापासून विविध सुगंधातील अगरबत्ती’ तयार करण्याच्या स्टार्टअपला शासनाकडे पेटंट मिळविण्यासाठी अहवाल पाठविला आहे.

‘केसीआयआयएल’ची मदत
गोविंदाच्या या इनोव्हेटिव्ह कल्पनेची दखल घेत खानदेश कन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील केबीसीएनएमयू सेंटर फॉर इनोव्हेवशन, इनक्युबेशन अँड लिंकेजस के-सीआयआयएल’ विविध प्रकारची मदत करीत आहे. जेणे करून गोविंदाचा हे इनोव्हेटीव ‘लोकल टु ग्लोबल’व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
गोविंदाला कुलगुरू प्रा. डॉ.विजय माहेश्‍वरी यांच्या नेतृत्वाखाली संचालक प्रा.भूषण चौधरी, संचालक प्रा. विकास गिते, व्यवस्थापक प्रा.निखिल कुलकर्णी आदींची मार्गदर्शन मिळाले आहे.

८० हजारांची झाली मदत
गोविंदाने बहिणाई चौधरी विद्यापीठातच एम.एसस्सी. (इलेक्ट्रीकल) केले आहे. कॅम्पस इंटरव्हूमधून त्याला पुण्यात अभियंता म्हणून नोकरी मिळाली. मात्र, स्वतःचा व्यवसाय करून नवीन काही तरी करून दाखविण्याची इच्छा होती. त्याने नोकरी सोडून सीएफएल बल्ब, मोबाईल चार्जर घरी तयार करणे सुरू केले. त्यात तोटा झाला. यामुळे त्याने पारंपरिक अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला. त्याला या व्यवसायाला लोकल टु ग्लोबल करण्यासाठी भांडवलाची गरज होती. २०१६ मध्ये त्याची विद्यापीठातील केबीआयआयएलमध्ये केळीच्या वेस्टेजपासून (खोडापासून) अगरबत्तीची निर्मिती प्रकल्पाचे सादरीकरण केले. हे इनोव्हेटीव्ह विद्यापिठाला आवडला त्याने ८० हजारांची मदत करीत अधिक उत्पादन कसे करता येईल, मार्केटींग इतर बाबींचे मार्गदर्शन केले.

असा विकसित केला प्रकल्पल
केळी कापल्यानंतर खोडासह इतर जे वेस्ट मटेरिअल निघते. त्यापासून त्याने कोळशात रुपांतर करण्याचे यंत्र विकसित केले. या यंत्रासाठी त्याला दहा लाखांची गरज होती. मात्र त्याने डोके लढवून केवळ आठ हजारांत ॲग्रो वेस्टपासून कोळसा (ग्रीन, बायो चार्जकोल) तयार करण्याचे यंत्र विकसित केले. या कोळशापासून अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारे मटेरिअल तयार करून अगरबत्ती बनविल्या. यामुळे प्रदूषण होत नाही. ॲग्रोवेस्ट वाया जात नाही. गोविंदाने खिर्डी येथे ॲग्री वेस्ट प्रा.लि.नावाने लहान उद्योग सुरू केला आहे.

मोगरा, गुलाब अन पायनापलही...
अशा केळीच्या खोडापासून तयार केलेल्या अगरबत्त्यांमध्ये मोगरा, गुलाब, लोभान, पायनापल, स्ट्रॉबेरी, रॉयल, फटेसिया आदी प्रकारच्या सूगंधातील अगरबत्ती तो तयार करून विकत आहे. या
प्रकल्पासाठी त्याला पुणे येथील ‘एमआयटीएडीटी युर्निर्व्हसिटीचा बेस्ट रियूजेबल एनर्जी प्रोजेक्ट’चा अवार्ड मिळाला आहे.

"या प्रकल्पातून सध्या ४० ते ४५ हजार अगरबत्या दररोज तयार करतोय, त्यातून तीन जणांना रोजगार दिला आहे. या प्रकल्पाला देशपातळीवर नेण्याचा मानस आहे." - गोविंदा सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझी अटक बेकायदेशीर'' वाल्मिक कराडचं नेमकं म्हणणं काय? उज्ज्वल निकमांनी गैरसमज दूर केला

Latest Marathi News Live Updates : उपनगरात पावसाने घेतली उसंत, मुंबईकरांना काहीसा दिलासा

Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवसह ८ खेळाडू ठरले, ७ खेळाडूंवरून घोडे अडले! गौतम गंभीर, अजित आगरकरच्या घोषणेकडे लक्ष

Sarfaraz Khan Century: कसोटी संघातून वगळले, त्या सर्फराजने खणखणीत शतक झळकावून निवड समितीला उत्तर दिले

Nashik Water Supply : इंदिरानगरची पाण्याची समस्या सुटणार; जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी

SCROLL FOR NEXT