Manoj Jarange Patil Sabha jalgaon esakal
जळगाव

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांची रविवारी जळगावमध्ये सभा

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने एल्गार पुकारला असून त्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता.३) मनोज जरांगे-पाटील यांची सभा जळगावमध्ये होईल.

सभेच्या निमित्ताने समाजातील बंधू-भगिनींची मोटारसायकल रॅली शनिवारी (ता.२) सकाळी दहाला काढण्यात येईल. (Manoj Jarange Patil meeting in Jalgaon on Sunday jalgaon news)

काव्यरत्नावली चौकातून रॅली सुरू होऊन आकाशवाणी चौक, बहिणाबाई उद्यान, रिंगरोड-गोकूळ स्वीट, कोर्ट चौक-नेहरू पुतळा-टॉवर चौक-भिलपुरा-रथचौक-नेरीनाका-पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, बसस्थानक मार्गे शिवतीर्थावर रॅली येईल. त्याठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून रॅलीचा समारोप होईल.

सभेच्या तयारीसाठी सकल मराठा समाजाच्या बैठकी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी पद्मालय विश्रामगृहात समाजाची बैठक झाली.

बैठकीला सुरेंद्र पाटील, प्रतिभा शिंदे, प्रमोद पाटील, गोपाल दर्जी, रवी देशमुख, माजी महापौर किशोर पाटील, सुरेश पाटील, संतोष पाटील, राजेंद्र देशमुख, राम पवार, दीपक चव्हाण, कुलभूषण पाटील आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत श्री. जरांगे-पाटील यांची सभा आणि मोटारसायकल रॅलीची माहिती देण्यात आली.

जरांगेंचा सत्कार

बालगंधर्व खुले नाट्यगृहात रविवारी सायंकाळी सातला मनोज जरांगे-पाटील यांचा सत्कार आणि सभा होईल. त्याआधी साडेसहाला श्री. जरांगे-पाटील यांचे जळगावमध्ये आगमन झाल्यानंतर खोटेनगर, शिवकॉलनी, आकाशवाणी चौकात स्वागत करण्यात येईल. शिवतीर्थावर अभिवादन करून ते सभास्थळी येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT