Senior citizen
Senior citizen esakal
जळगाव

ज्येष्ठांशी कोणी गोड बोलून घेतला घराचा ताबा तर कोणी बळकावली जमीन

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : वृद्ध आईवडिलांना मुले वागवत नसून काहींनी मालमत्ता हडप करून घेतल्याच्या चार वेगवेगळ्या कुटुंबाच्या तक्रारीत उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्यासमोर आल्या. त्यावर अहिरे यांनी सुनावणी करीत मुलांनी आईवडिलांना खावटी द्यावी आणि फसवणूक करून ताब्यात घेतलेल्या मालमत्ता त्यांना परत करण्याचा निर्णय दिल्याने चार कुटुंबांना न्याय मिळाला आहे.

शिरूड येथील लोटन पाटील यांची पत्नी अपंग असून चालता फिरता येत नाही. तेसुद्धा अनेक रोगांनी त्रस्त आहेत. आपली तीन मुले नवनीत पाटील, महादू पाटील व रवींद्र पाटील हे त्यांच्यासाठी औषधोपचार इतर गरजा पूर्ण करीत नसून गोड बोलून जमीन हडप करून घेतली आहे. पत्नीच्या दवाखान्याच्या खर्चासाठी मुलांनी घर खाली करून द्यावे, अशी मागणी आईवडील व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियमान्वये उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार सुनावणी घेण्यात येऊन सीमा अहिरे यांनी निकाल दिला. त्यानुसार, लोटन पाटील यांच्या पत्नीच्या नावाच्या घराचा ताबा परत त्यांच्या पत्नीला देण्यात यावा आणि नवनीत याने ५०० रुपये व महादू आणि रवींद्र यांनी प्रत्येकी १ हजार रुपये खावटी मे २०२२ पासून हयातीपर्यंत देण्यात यावी.

पिळोदा येथील सुरेश बडगुजर व उशाबाई बडगुजर यांनी तक्रार केली, की वृद्धापकाळाने त्यांच्याकडून शेती होत नाही म्हणून त्यांनी शेती गहाण ठेवून ते उपजीविका करीत आहेत. मात्र अर्धांगवायू, मधुमेह तसेच स्मृतिभांश झाल्याने औषधोपचारासाठी खर्च येत असतो म्हणून मुलगा व सुनेने दरमहा खावटी देण्याची मागणी केली आहे. त्यात सुनावणी घेऊन उपविभागीय अधिकारी अहिरे यांनी सून मुलाजवळ राहत नसल्याने तिची जबाबदारी नाही. मुलगा विनोद बडगुजर आणि कविता व हेमलता या दोन मुलींनी प्रत्येकी एक हजार रुपये खावटी देण्याचे आदेश दिले आहेत.

तिसऱ्या घटनेत तालुक्यातील निंब येथील रामदास कोळी व सुमनबाई कोळी यांनी मागणी केली होती की त्यांची मुले रमेश, दिलीप, सोपान हे सांभाळ करीत नाहीत. तसेच त्यांना त्यांच्या मालकीच्या घराचा ताबा मुलांकडून परत मिळावा आणि मालमत्तेबाबत फसवणुकीने केलेले वाटणीपत्र रद्द करण्यात यावे. त्यावर सुनावणी घेऊन अहिरे यांनी निर्णय दिला, की घर मिळकतीचा ताबा आईवडिलांना देण्यात यावा तसेच उपकोषागार अधिकारी यांच्याकडे केलेले वाटणीपत्र रद्द करून त्यावर आई वडिलांचे नाव लावण्यात यावे. तिन्ही मुलांनी आईवडील हयात असेपर्यंत प्रत्येकी एक हजार रुपये खावटी द्यावी.

सुरेश पाटील (रा. विद्युतप्रभा कॉलनी) यांनी तक्रार केली होती, की मुलगा जगदीश साळुंखे, सून नैना साळुंखे हे दोघेही नोकरी करत असून जबाबदारी घेत नाहीत. त्यांनी घराचा ताबा मागून खावटीची मागणी केली होती. त्यावर सुनावणी घेण्यात आली. यात मुलाने देखील सांगितले, की देखभाल करून देखील वडील अश्लील शिवीगाळ करतात. वडील शेतीचे उत्पन्न व घरभाडे स्वतः घेतात तसेच घरात लघवी करणे, थुंकणे असे प्रकार करतात. त्यावर अहिरे यांनी घराचा ताबा वडिलांना देण्यात येऊन दोघांनी प्रत्येकी दोन हजार रुपये खावटी द्यावी असा निर्णय दिला आहे. चारही प्रकरणात तहसीलदार व संबंधित पोलिस निरीक्षक यांनी आदेशाची अमलबाजवणी करून अहवाल सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT