bike slip accident
bike slip accident 
जळगाव

गाडीवर बसण्याची हौस जीवावर बेतली; अवघ्‍या काही अंतरावर गाडी खड्ड्यात अन्‌..

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय मुलगा दुसऱ्याच्या दुचाकीवर बसला. गाडीचे चाक खड्ड्यात गेले आणि गाडीवरून पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्‍याचा जागीच मृत्यू झाल्‍याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी संध्याकाळी उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

मित्राला म्‍हणाला चल चक्‍कर मारू
सुप्रीम कॉलनीतील आयान सुलतान पटेल (वय १२) हा दुपारी साडेबाराच्या दरम्‍यान घराच्या अंगणात गल्लीतील मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता आपण दोघे दुसऱ्याच्या दुचाकीवरून एक चक्कर मारू; असे मित्राला सांगितले. त्‍यांनी केलेही तसेच अन्‌ आयान दुचाकीवर मागे बसला. सुप्रीम कॉलनीच्या ईदगाह मैदानजवळ एक मोठ्या खड्ड्यासमोर आल्याने गाडी चालवणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा दुचाकीवरील ताबा सुटला, त्यात दोघे खड्ड्यात पडले. मागे बसलेला आयानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले व वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

वडील करतात हमालीचे काम
मयत आयन पटेल यांचे वडील सुलतान फकीरा पटेल हे हमालीचे काम करतात तर आई रेश्मा पटेल या गृहिणी आहेत. मोठा भाऊ तैहिद हा शिक्षण घेत आहे. अपघातात आयानचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT