जळगाव

विवाह आटोपून घरी परतल्‍यावर कुटुंबाला बसला हादरा

विवाह आटोपून घरी परतल्‍यावर कुटुंबाला बसला हादरा

सकाळ डिजिटल टीम

चाळीसगाव (जळगाव) : विवाह सोहळ्यानिमित्‍ताने दुसर्‍या शहरात गेलेल्या अग्रवाल परिवाराच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून दागिने आणि रोकड लांबविली. साधारण ७ लाख ३७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. (chalisgaon-agrawal-family-gone-marriage-and-home-robbery)

चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौकातील चामुंडा माता मंदिराच्यामागे कपिल दुर्गाप्रसाद अग्रवाल कुटुंबासह राहतात. तेथेच खालच्‍या मजल्यावर त्यांचे बंधू तर पहिल्या मजल्यावर कपिल अग्रवाल राहतात. बुधवारी (२३ जून) ते सकाळी पत्नी, आई आणि मुलांसह अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे नातेवाईकाकडे विवाह सोहळ्यासाठी गेले होते.

कुटुंब परतल्‍यानंतर प्रकार उघड

विवाह सोहळा आटोपल्‍यानंतर कुटुंब आज पहाटे चारच्‍या सुमारास परत आले. त्यांना बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. यात कपाटातील दागिने आणि यातील रोकड रक्कम लंपास झाल्याचे आढळून आले. त्यांनी सामान तपासून पाहिले असता, सोन्याचे दागिने आणि रोख साडेचार लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याचे त्यांना दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून सुमारे ७ लाख ३७ हजार पाचशे रूपयांची लुट केल्याचे निष्पन्न झाले.

मध्‍यरात्रीनंतर आवाज आला मात्र

कपिल अग्रवाल यांनी खालच्‍या मजल्यावर राहणारे त्यांचे मोठे बंधू प्रकाश यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान वरील मजल्यावर जड वस्तू पडल्याचा आणि कुणी तरी चालत असल्याचा आवाज आला. मात्र त्यांनी घाबरून याबाबत कुणाला माहिती दिली नसल्‍याचे सांगितले. यानंतर कपिल अग्रवाल यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT