Kannada Ghat
Kannada Ghat 
जळगाव

कन्नड घाटाकडून जाताय..तर थांबा दुरूस्‍तीचे काम आहे सुरू; या मार्गाने जा

सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव (जळगाव) : जळगाव- धुळे- औरंगाबाद या जिल्ह्यांच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणारा औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 या मार्गावर येणाऱ्या औट्रम घाटातील सुमारे नऊ किलोमीटरचा रस्‍त्‍यावर मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. मात्र या रस्‍त्‍याच्या दुरूस्‍तीचे काम हाती घेण्यात आले असून हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
कन्नड घाटातील रस्‍त्‍याची तातडीने दुरूस्‍तीबाबत खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्ली येथून औरंगाबाद येताना गेल्या बुधवारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्यासोबत बैठक खासदार भागवत कराड यांच्या कार्यालयात घेतली होती. यात अधिकाऱ्यांनी आजच्या आज कन्नड घाटाची पाहणी करून तातडीने या घाटातील खड्डे बुजविण्यासाठी येत्या आठवड्यात मोहिम हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने आज (ता.८) कन्नड घाटातील खड्यांची दुरुस्तीचे काम सकाळी नऊ वाजता सूरू होणार आहे.

डांबरीकरणही होणार
प्रमूख तीन मुद्द्यांवर खासदार उन्मेश पाटील यांनी बैठकीत माहिती दिली होती. खासदार पाटील यांनी आधी तातडीने घाट रस्ता दुरुस्तीसाठी पावले उचलावीत तसेच पंचवीस कोटी रुपये खर्चून रुंदीकरण इतर कामांचा प्रस्ताव मार्गी लावावा. तसेच पाच हजार रुपये खर्चून टनेल बोगदा कामाबाबत येत्या अधिवेशनात पावले उचलावीत. याकरीता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पत्र दिले होते. त्या अनुषंगाने १६ फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे केंद्रीय तांत्रिक व्यवस्थापक नरेश वडतेवार यांनी घाटाची दुरूस्तीचे काम दिलीप बिल्डकॉन यांना दिले असल्याचे पत्र दिले होते. मात्र तूर्तास घाटातील खड्डे बुजवावेत आणि म्हसोबा मंदिराच्या जवळपास दोन तीन किलोमीटर रस्तावर डांबरीकरण करण्यात यावे जेणेकरून सद्यस्थितीत रस्त्याची दुरावस्था संपून प्रवाश्यांची गैरसोय दूर होईल.त्याकरिता येत्या दोन तिन दिवसांत दुरुस्ती करण्याचे आदेश खासदार उन्मेश पाटील यांनी दिले होते.

दुरुस्तीसाठी कन्नड घाट बंद 
कन्नड घाटातील रस्त्याची दुरूस्‍ती करण्यात येत असल्‍याने आज (ता.८) वाहतूक बंद करण्याचे सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. खासदार उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्यातून कन्नड घाटातील खड्यांची दुरूस्ती केली जाणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक  ए. आर. काळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

जनतेची वाहतूक कोंडीतून सुटका होणार 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 55 (जुना महामार्ग क्रमांक 211) दुरुस्त करण्यात यावा. यासाठी सोशल मीडियावर जोरदार मागणी सुरू झाली होती. कन्नड घाटात सुमारे आठ किलोमीटरचा रस्तात मोठे खड्डे पडल्याने तसेच बाजूचे बॅरिकेट्स तुटल्याने व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या अडचणी वाढल्याने रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली होती. सातत्याने आठ- दहा तास वाहतुकीची कोंडी होत असल्याने कन्नड घाटातून प्रवास करणे जिकरीचे झाले होते. वाहतूक पोलीस प्रसाशन देखील दररोजच्या वाहतूक कोंडी सूरुळीत करण्यात हैराण झाली होती. गेल्या अनेक दिवसापासून कन्नड घाटात सातत्याने ट्राफिक जाम झाल्याने प्रवाशी नागरिक व वाहतूकदार आणि पोलीस प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु रस्‍त्‍याच्या दुरूस्‍तीनंतर हा प्रश्‍न सुटणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT