jalgaon civil hospital
jalgaon civil hospital 
जळगाव

कधी नव्हे तो सिव्हिलमध्ये सर्वसामान्यांना मिळतोय सुखद अनुभव 

देवीदास वाणी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्ह्यातून शेकडो नागरिक वैद्यकीय सेवेसाठी रोज येत आहेत. परिसरात मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या जनसंपर्क कक्षातून नागरिक, दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना योग्य माहिती मिळत असल्याने हेलपाट्या कमी झाल्या आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. 
केसपेपर काढण्यासाठी महिला व पुरुषांची वेगळी रांग आणि कायदेशीर प्रकरणासाठी (एमएलसी) तिसरी खिडकी सुरू झाली आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांचा वेळ वाचत आहे. तसेच रुग्णांसह नातेवाइकांना नागरिकांना माहिती देण्यासाठी आवारातच जनसंपर्क कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे नातेवाइकांना रुग्णाची माहिती मिळणे, ओपीडी, योजनांविषयी, रुग्णालय व महाविद्यालयातील सोयी-सुविधांविषयी माहिती दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या रुग्णांसह नातेवाइकांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. रुग्णालय अद्ययावत होत असल्याने पूर्वीचे ‘सिव्हिल’ आता अधिकच बदलले आहे. 

केसपेपरची सुविधा सोयीची
रुग्णालयाच्या आवारात मुख्य गेट क्रमांक एकसमोर केसपेपरच्या विभागाची सुविधा केल्यामुळे गर्दी नियंत्रित राहून रुग्णांसह नातेवाईक सुखावले आहेत. येणाऱ्या रूग्‍णांना केसपेपर काढणे सोपे होवून उपचार लवकर घेण्यास मदत होत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : 'अब 400 पार'ला लागले ग्रहण! अजूनही भाजप बहुमतापासून दूर, इंडियाकडे काय आहे कल?

Maharashtra Lok Sabha Election Results Live : वंचित बहुजन आघाडी मुंबईत फेल? अपेक्षेपेक्षा वंचित बहुजन आघाडीला अत्यल्प मतदान

Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या रिंगणातील कलाकारांची प्रतिष्ठा पणाला; कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? जाणून घ्या एक क्लिकवर

Odisha Election Result: ओडिशामध्ये मोदीराज? नवीन बाबू पिछाडीवर, भाजपला मिळालं बहुमत

पहिल्या पाच फेऱ्यात आमदार प्रणिती शिंदे अन्‌ राम सातपुतेंना किती मतदान, कोणत्या मतदारसंघातून किती मतदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT